प्रतिनिधी.
पत्रकारांचे राष्ट्रीय कुटुंब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय पत्रकार संघाची १२ वी वार्षिक राष्ट्रीय महासभा मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील नवनीत गुजराथी समाज भवनात मोठ्या उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन सी.डब्लू.सी .कॉलेजचे प्राचार्य अजय कौल यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भारतीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विक्रम सेन यांना भूषविण्यात आले होते.
या वार्षिक महासभेत भारतातील प्रत्येक राज्यातील ए.आय.जे.च्या संघटनात्मक कार्यासह पत्रकारांची सुरक्षा पत्रकारांच्या मुलांसाठी उच्चस्तरीय शिक्षणात सवलत, आरोग्य सेवा तसेच पत्रकारांसाठी कार्यान्वित असलेल्या कल्याणकारी योजनांबाबत सखोल चर्चा करून आगामी ध्येय धोरणांचा आढावा देखील घेण्यात आला.
यावेळी पत्रकार संघात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख कमलेश शेवाळे नागपूरच्या सविता कुलकर्णी पुणे जिल्हाध्यक्ष तैनुर शेख सातारा विभागाचे विकास शिंदे लातूरचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय परळकर धाराशिव जिल्हा प्रमुख उमेश काळे पूर्व खान्देशचे विभाग प्रमुख हेमकांत गायकवाड परभणीचे राजकुमार मुंढे अहिल्यानगर जिल्हा प्रमुख शरद परदेशी बारामती तालुक्याचे अध्यक्ष मधुकर बनसोडे माजी अध्यक्ष विनोद गोलांडे पुणे शहराध्यक्ष प्रवीण जाधव हल्ला कृती समिती प्रमुख आबासो तांबे लीगल विंगचे पांडुरंग ढोरे संदीप कांबळे आदी मान्यवरांना ए.आय.जे.च्या वतीने सन्मानचिन्ह प्रमाणपत्र व मेडल देऊन त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन ए.आय.जे.राष्ट्रीय कार्याध्यक्ष एवम् महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष एम.एस.शेख तसेच प्रदेश कार्याध्यक्ष सिकंदर नदाफ प्रदेश महासचिव रमेश गणगे व लीगल विंगचे प्रदेश अध्यक्ष कैलास पठारे यांच्या सहविचाराने करण्यात आले होते.तर या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय कार्यवाहक किरण गोगाई उपाध्यक्ष रविंद्र नेरकर पवन पाठक मुख्य सचिव मनोहर मंडलोई महिला विंगच्या दीपिका व्दिवेदी जितु सोनी गोपाल मारवाडी किशोर दग्गी सय्यद बाबू शेख शोयब मियानूर यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.












