Image

विद्यार्थांनी योग्य संगत निवडावी – सपोनि. मनोजकुमार नवसरे

सोमेश्वरनगर ( वा )
विद्यार्थीदशेत असताना नेहमी चांगली संगत निवडावी. चुकीची संगत आयुष्य बरबाद करू शकते. अमली पदार्थाच्या सेवनाने गंभीर गुन्हे घडतात त्यामुळे त्यापासून दूर रहा असे आवाहन सुपे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांनी केले.
सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सोमेश्वर विद्यालय आंबी बुद्रुक येथे अमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियाना अंतर्गत सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की सुरुवातीच्या काळात केवळ मजा म्हणून केलेले व्यसन नंतरच्या काळात उग्र स्वरूप धारण करते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांत प्रचंड ऊर्जा असते त्यामुळे या ऊर्जेचा सकारात्मक वापर करायला हवा. अमली पदार्थांच्या सेवनाने गंभीर अपघात होतात. अल्पवयीन मुलांचे गुन्हेगारीतील वाढते प्रमाण चिंताजनक आहे. रिल व रिअल आयुष्य वेगळी असून विद्यार्थ्यांनी आभासी दुनियेत जगू नये. असे आवाहन त्यांनी केले
सायबर जनजागृती यावर बोलताना ते म्हणाले की या वयात विद्यार्थ्यांनी मोबाईलचा योग्य वापर करावा. सर्व सोशल मीडिया साईट पासून दूर राहावे. अनोळखी व्हिडिओ कॉल उचलू नये. एपीके फाईल्स डाऊनलोड करू नये. ओटीपी कुणालाही सांगू नये. डिजिटल अवेअरनेस बाबत विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना माहिती द्यावी.
वाहतुकीच्या नियमाबाबत बोलताना मनोजकुमार नवसरे म्हणाले की अल्पवयीन मुलांनी दुचाकी चालवल्यास पालकांवर गुन्हा दाखल होणार आहे. त्यांच्याकडून मोठा दंड वसूल होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वाहने चालवू नयेत.
मुलींना कुणीही त्रास देत असेल तर त्यांनी याबाबतची माहिती आपले पालक किंवा शिक्षकांना सांगावी. कुणी चुकीच्या ठिकाणी स्पर्श करत असेल तर त्याचा विरोध करून त्याची माहिती आपल्या पालकांना द्यावी.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप गार्डी, आंबी बुद्रुक च्या सरपंच शितल जगताप, विद्यालयाचे मुख्याध्यापक विजयकुमार शिंदे, पोलीस कर्मचारी तुषार जैनक, सोमनाथ होले व निहाल वणवे, सारीका जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयातील शिक्षक हेमंत गडकरी यांनी केले. सूत्रसंचालन संतोष जेधे यांनी केले.
……………
चौकट – ड्रेस नको, हेल्मेट घ्या.
रस्ते अपघाताच्यावेळी दुचाकीस्वारांच्या डोक्यावर हेल्मेट असेल तर गंभीर दुखापतीची शक्यता कमी होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना आम्हाला नवीन ड्रेस नको तर तुम्हाला हेल्मेट विकत घ्या असे आवाहन करायला हवे असे आवाहन मनोजकुमार नवसरे यांनी विद्यार्थ्यांना केले.

Releated Posts

लोकनेते कै. बाबालालजी काकडे देशमुख पुण्यतिथी निमित्त तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न…

प्रतिनिधी. निंबुत ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित श्री. बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालय, निंबुत यांच्या वतीने सोमवार दिनांक ३ऑगस्ट २०२६…

ByBymnewsmarathi Aug 4, 2026

सोमेश्वर कारखाना दुकान लाईन प्रकरणात गाळेधारकांना दिलासा; ये-जा करण्यासाठी लावलेले पत्र्याचे अडथळे हटविण्याचा न्यायालयाचा आदेश

संपादक मधुकर बनसोडे सोमेश्वर सहकारी साखर कारखाना परिसरातील दुकान लाईन वादात बारामती न्यायालयाने महत्त्वपूर्ण आणि स्पष्ट भूमिका घेत…

ByBymnewsmarathi Aug 4, 2026

लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १06 वी जयंती निंबूत येथे उत्साहात साजरी; दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील निंबूत येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १06 वी जयंती अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात…

ByBymnewsmarathi Aug 1, 2026

रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी १५ ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा इशारा

प्रतिनिधी. बारामती, दि. ३१ जुलै : कऱ्हाटी (ता. बारामती) येथील ग्रामपंचायत हद्दीतील सार्वजनिक रस्त्यावर झालेल्या कथित बेकायदेशीर अतिक्रमणाविरोधात…

ByBymnewsmarathi Jul 31, 2026

दि.२ ऑगस्ट रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’; सर्व शासकीय सेवा सोमेश्वर मध्ये एकाच छताखाली होणार उपलब्ध.

 प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत बारामती विधानसभा मतदारसंघात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे.…

ByBymnewsmarathi Jul 30, 2026

मुंबईत भारतीय पत्रकार संघाची वार्षिक महासभा उत्साहात

प्रतिनिधी. पत्रकारांचे राष्ट्रीय कुटुंब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय पत्रकार संघाची १२ वी वार्षिक राष्ट्रीय महासभा मुंबईतील अंधेरी पश्चिम…

ByBymnewsmarathi Jul 29, 2026

‘एक अधिकारी, एक सरकारी गाडी’ : केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय; अतिरिक्त पदभारासाठीही दुसरे वाहन नाही

प्रतिनिधी शासकीय खर्चात बचत, सरकारी वाहनांचा कार्यक्षम वापर आणि प्रशासनात अधिक पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय…

ByBymnewsmarathi Jul 28, 2026

लग्नाचे आमिष दाखवून महिला वकिलाची फसवणूक, लैंगिक शोषण व आर्थिक गैरफायदा; पोलीस हवालदाराविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल

प्रतिनिधी. बारामती – बारामती शहर पोलीस स्टेशन येथे एका महिलेने (ओळख गोपनीय ठेवण्यासाठी काल्पनिक नाव “निर्भया”) दिलेल्या फिर्यादीवरून…

ByBymnewsmarathi Jul 28, 2026