मुख्य मजकुरावर जा
Monday, 21 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 06 August 2026 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरातून लाभार्थ्यांना तात्काळ दिलासा; ७५ पारधी बांधवांना जातीचे दाखले

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
August 6, 2026 1 मिनिट वाचन 8,542 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी.
बारामती, दि. ६ ऑगस्ट : सोमेश्वर इंजिनीअरिंग कॉलेज येथे दि. २ व ३ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरामध्ये विविध महसुली योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना तातडीने उपलब्ध करून देण्यात आला.
दि. ३ ऑगस्ट रोजी शौर्या रसाळ (रा. चोपडज) यांनी संजय गांधी दिव्यांग अनुदान योजनेसाठी, तर माधुरी जगताप (रा. मुरूम) यांनी संजय गांधी विधवा अनुदान योजनेसाठी अर्ज सादर केला होता. या दोन्ही अर्जांवर तातडीने कार्यवाही करत तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी दि. ४ ऑगस्ट २०२६ रोजी अनुदान मंजूर केले. विशेष म्हणजे, त्याच दिवसापासून संबंधित लाभार्थ्यांना योजनेचा प्रत्यक्ष लाभ सुरू करण्यात आला.
याशिवाय, मौजे निंबूत येथील पारधी समाजातील तब्बल ७५ नागरिकांचे जातीच्या दाखल्यांसाठी अर्ज अवघ्या चार दिवसांत पूर्ण करून शिबिरामध्येच त्यांना जातीचे दाखले वितरित करण्यात आले. कमी कालावधीत मोठ्या प्रमाणावर ही प्रक्रिया पूर्ण झाल्याने लाभार्थ्यांनी महसूल प्रशासनाबद्दल समाधान व्यक्त केले.
शिबिरातील विविध योजनांची अंमलबजावणी कमी वेळेत प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी विशेष पुढाकार घेतला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महसूल यंत्रणेने समन्वयाने काम करत नागरिकांना वेळेत लाभ मिळवून दिला.
या कार्यात मंडळ अधिकारी, करंजेपूल, सर्व ग्राम महसूल अधिकारी, करंजेपूल, तसेच महसूल सेवकांनी लाभार्थ्यांना आवश्यक ते सहकार्य करून प्रक्रिया सुलभ केली.
संपूर्ण शिबिराच्या नियोजन व अंमलबजावणीसाठी उपविभागीय अधिकारी, बारामती श्री. उत्तम दिघे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याने शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख