मुख्य मजकुरावर जा
Friday, 11 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 11 September 2026 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

पुणे हादरले! MPSC अधिकाऱ्याच्या तोंडाला काळे फासले; संभाजी ब्रिगेडचा आक्रमक पवित्रा, राजीनाम्याची मागणी

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
September 11, 2026 1 मिनिट वाचन 3,507 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी

कथित पेपरफुटी प्रकरणावरून MPSC प्रशासनावरील रोष अधिकच तीव्र झाला असून, संभाजी ब्रिगेडचे राज्य उपाध्यक्ष आण्णासाहेब सावंत यांनी सहकाऱ्यांसह अधिकाऱ्याच्या दालनात प्रवेश करत काळे फासल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महेंद्र हरपाळकर यांच्या दालनात हा प्रकार घडला असून, त्यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी आक्रमक मागणी सावंत यांनी केली आहे.

महेंद्र हरपाळकर यांनी राजीनामा दिला नाही, तर थेट MPSC अध्यक्षांच्या दालनात घुसून त्यांच्या तोंडालाही काळे फासले जाईल, असा उघड इशारा आण्णासाहेब सावंत यांनी दिला आहे. या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भरती प्रक्रियेतील पारदर्शकता आणि उमेदवारांच्या भवितव्याशी खेळ होत असल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेडने या प्रकरणी थेट आक्रमक भूमिका घेतली आहे.

​विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा आणि प्रमुख मागण्या

यापूर्वी, कथित पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ पुण्यात विद्यार्थ्यांनी मोठा आक्रोश मोर्चा काढला होता. ओंकारेश्वर मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चानंतर विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे उमेदवार आणि काही राजकीय नेते सहभागी झाले होते.

  • ​कथित पेपरफुटी प्रकरणाची उच्चस्तरीय व सखोल चौकशी करावी.
  • ​दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
  • ​MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार आणि सचिवांनी तात्काळ राजीनामा द्यावा.
  • ​MPSC प्रशासनाची जबाबदारी निश्चित करून परीक्षांमध्ये पारदर्शकता आणावी.

​स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, राज्य सरकारने या प्रकरणात ठोस भूमिका न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. संभाजी ब्रिगेडच्या या आक्रमक भूमिकेमुळे MPSC मधील कथित गैरव्यवहाराचा प्रश्न पुन्हा एकदा राज्यभरात ऐरणीवर आला आहे.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख