इंस्टाग्रामवरील फेक अकाउंटद्वारे विद्यार्थीनीस अश्लील मेसेज करून त्रास देणाऱ्या विधिसंघर्षग्रस्त बालकाचा माळेगाव पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपासातून लावला शोध
महत्त्वाचे मुद्दे
- १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
- २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
- ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.
माळेगाव पोलीस ठाणे हद्दीतील एका महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीस अज्ञात व्यक्तीकडून इंस्टाग्रामवर फेक अकाउंट तयार करून वारंवार अश्लील मेसेज पाठवून त्रास दिला जात असल्याची घटना निदर्शनास आली होती. संबंधित इंस्टाग्राम अकाउंट विद्यार्थीनीने ब्लॉक केल्यानंतर आरोपीने पुन्हा नवीन फेक अकाउंट तयार करून त्याद्वारे अश्लील मेसेज पाठवून त्रास देण्यास सुरुवात केली.
याबाबत संबंधित विद्यार्थीनीने शक्ती अभियानांतर्गत दिनांक २१/०८/२०२६ रोजी माळेगाव पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली होती.
सदर तक्रारीची माळेगाव पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी तांत्रिक तपास सुरू केला.
माळेगाव पोलीस ठाण्याच्या सायबर टीमने अत्यंत कौशल्यपूर्ण व तांत्रिक पद्धतीने तपास करून उपलब्ध डिजिटल माहिती, सोशल मीडिया अकाउंट्स व तांत्रिक बाबींच्या आधारे आरोपीचा माग काढला. सदर गुन्हा हा विधिसंघर्षग्रस्त बालकाकडून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले.
त्यानंतर विधिसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेऊन गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेला मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. तसेच संबंधित विधिसंघर्षग्रस्त बालकाचे आवश्यकतेनुसार समुपदेशन करण्यात आले असून, त्यासंदर्भात कायद्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.
या कारवाईमुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा गैरवापर करून मुली व महिलांना त्रास देणाऱ्या व्यक्तींविरुद्ध माळेगाव पोलिसांची कठोर व तात्काळ कारवाई करण्याची भूमिका स्पष्ट झाली आहे.
मुली व महिलांनी सोशल मीडियावर अशा प्रकारचा त्रास होत असल्यास घाबरून न जाता तात्काळ पालक, शिक्षक किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. तसेच अश्लील मेसेज, फेक अकाउंट, धमकी किंवा ऑनलाइन छळासंदर्भातील स्क्रीनशॉट, अकाउंटची लिंक/यूजरनेम व इतर डिजिटल पुरावे सुरक्षित ठेवावेत.
सदरची कामगिरी मा. संदीपसिहं गिल पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, मा. गणेश बिरादार अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग, मा. चैतन्य कदम उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीशेल चिवडशेट्टी पोलीस निरीक्षक बारामती शहर, सहा. पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ माळेगाव पोलीस स्टेशन, पोलीस अंमलदार ज्ञानदेव सानप, विकास राखुंडे यांनी केली आहे.
