मुख्य मजकुरावर जा
Saturday, 19 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 19 September 2026 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

बारामती! माळेगावच्या शिवनगर मध्ये कंपाउंड पाडण्यावरून वाद ; ट्रॅक्टर अंगावर घालून दगडाने आणि हाताने मारहाण” पोलिसांकडून पाच जणांना अटक.

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
September 19, 2026 1 मिनिट वाचन 3,503 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी –

माळेगाव शिवनगर ता. बारामती येथे घरासमोरील सिमेंटच्या विटांचे कंपाउंड परवानगीशिवाय ट्रॅक्टरने धडक देऊन पाडल्याचा आरोप करत पाच जणांविरुद्ध माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार..
ही घटना १८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजता शिवनगर येथे फिर्यादी यांच्या घरासमोर घडली. फिर्यादी अविनाश बाळकृष्ण नरूटे यांच्या तक्रारीनुसार आरोपी रणजीत लालासो ढोले हा नंबर नसलेला ट्रॅक्टर घेऊन आला आणि ट्रॅक्टरच्या पुढील लोखंडी भागाने घरासमोरील कंपाउंडला वारंवार धडक देऊन नुकसान केले.

कंपाउंड पाडण्याचा प्रकार थांबविण्यासाठी फिर्यादी व त्यांचे भाऊ नंदकिशोर गेले असता रणजीत ढोले याने ट्रॅक्टर त्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. त्यानंतर सुजित लालासो ढोले, तेजम सुनिल ढोले, सुनिल शंकर ढोले व बाळासो शंकर ढोले यांनी बेकायदेशीर जमाव करून दगडाने व हाताने मारहाण केली तसेच शिवीगाळ व दमदाटी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणी माळेगाव पोलीस ठाण्यात BNS कलम ११०, ११८(१), १८९(२), १९१(२), १९०, ११५(२), ३५१(२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
गुन्ह्याचा पुढील तपास माळेगाव पोलीस पोसई साळवे करीत असून

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख