मुख्य मजकुरावर जा
Monday, 21 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 21 September 2026 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

सोमेश्वरच्या निवडणूकीवेळी स्वर्गीय अजितदादांना लिहीलेलं पत्र सोशल मिडीयावर तुफान व्हायरल..

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
September 21, 2026 1 मिनिट वाचन 3,505 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

 

सध्या सोमेश्वर स.सा.कारखान्याचे निवडणूक जाहीर झाल्यानंतर हे पत्र सोशल मीडिया वर खूप वायरल होत आहे

 

आदरणीय,स्वर्गीय अजितदादा बघतायं ना सोमेश्वरकडे?तुम्ही मोठा केलेला प्रेमाने जपलेला,वाढवलेला वृक्ष अन् आज त्याच वृक्षाच्या सावलीतून तुमच्या मुलाला पद्धतशीर बाहेर ढकललं जातयं.विषय सविस्तर असा की दोन महिन्यात सोमेश्वर स.सा.कारखान्याचे दोन वेगवेगळे अहवाल सभासदांना घरपोहच मिळाले,सगळा लेखाजोखा होता त्यात,नेत्यांचे फोटो,तुम्ही मोठे केलेल्या काही पुढाऱ्यांचं कौतुक असं सगळं सगळं होतं त्यात.उणीव होती ती तुमच्या पक्षात तालुक्याचं नेतृत्व करणाऱ्या,लोकप्रतिनिधी म्हणून संसदेत इथले प्रश्न मांडणाऱ्या तुमच्या मुलाच्या नामोल्लेखाची.तुमच्याच आशिर्वादाने मोठे झालेले,तुमच्याच पक्षातील काही लोकं कसं तुमच्याच कुटुंबाला बाजूला करण्यात गुंतलयं बघतायं ना?लोकसभा निवडणूकीवेळी अशाच्या छुप्या स्वपक्षीय विरोधकांमुळेच कदाचीत आदरणीय सुनेत्रावहिनींचा पराभव झाला असावा.आणि आता तुमच्या पक्षातील अशाचं घातकी लोकांनकडून तुमच्या मुलावर राजकीय वार केला जात आहे.तुम्ही हयात असताना लपून छपून कट करणारे आता उघड उघड तुमच्याच कुटुंबावर राजकीय डावपेच करण्याच्या तयारीत दिसत आहेत.पार्थ सावध हो हे तुम्ही आता पार्थ दादांना सांगायची वेळ आली आहे.राजकारण लै वंगाळ हे तुमचेच बोल तुमच्याच कुटुंबाविरोधात आता करण्याचा डाव चालू आहे….लक्ष ठेवा दादा…सोमेश्वरवर आणि कुटुंबावर…हे माझं एकट्याचं मत नसून तुमच्यावर प्रेम करणाऱ्या हजारो सभासदांची खंत आहे…आशिर्वाद असूद्यात दादा🙏

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख