मुख्य मजकुरावर जा
Monday, 21 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 21 September 2026 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

अजितदादांचे स्मारक उभारण्यावरती सर्वांचे एकमत, मंगल कार्यालय बांधण्याचीही सभासदांची मागणी; सोमेश्वर कारखान्याची ६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
September 21, 2026 1 मिनिट वाचन 3,501 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी

सोमेश्वरनगर : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची ६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सभासदांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेत मांडण्यात आलेले सर्व विषय सभासदांनी सर्वानुमते मंजूर केले.

यावेळी अजितदादांचे स्मारक उभारण्यावरती सर्वांचे एकमत झाले. कारखान्याच्या परिसरात अजितदादांचे भव्य दिव्य स्मारक उभारण्यात यावे, अशी भावना व्यवस्थापनाने व्यक्त केली. या मागणीला उपस्थित सभासदांकडून एकमताने पाठिंबा देण्यात आला.

तसेच कारखान्याच्या परिसरात सभासद व शेतकऱ्यांच्या विविध कार्यक्रमांसाठी मंगल कार्यालय बांधण्यात यावे, अशी मागणीही सभासदांनी केली. कारखान्याच्या विकासासोबतच सभासदांच्या सोयी-सुविधांकडे लक्ष देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

सभेत कारखान्याशी संबंधित विविध विषयांवर चर्चा झाली. सभासदांनी आपली मते मांडल्यानंतर सर्व विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

 शिक्षण संस्थेवरती विशेष लक्ष देण्याची गरज असल्याची भावना सभासदांमधून व्यक्त करण्यात आली.

 सोमेश्वर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरू असल्यामुळे आज होणारी सभा ही वादळी होते की काय असे प्रत्येकाला वाटत होते मात्र खेळीमेळीच्या वातावरणामध्येच आजची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली एक वाजता सुरू झालेली सभा जवळपास साडेसहा वाजता संपली.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख