बारामती! गणेश विसर्जन मिरवणुकीत अश्लील हावभाव अन् बिभत्स नृत्य; वडगाव निंबाळकर पोलिसांकडून ७ जणांवर गुन्हा दाखल.
महत्त्वाचे मुद्दे
- १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
- २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
- ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.
वडगाव निंबाळकर प्रतिनिधी –
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान अश्लील हावभाव, अंगविक्षेप व बिभत्स नृत्य केल्याप्रकरणी तसेच पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून वडगाव निंबाळकर पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई २३ सप्टेंबर रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास मतकर वस्ती, माळशिकारेवाडी, कोहाळे बुद्रुक येथे करण्यात आली.
श्री साई समर्थ तरुण मंडळ, माळशिकारेवाडी, कोहाळे बुद्रुक यांच्या गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान ट्रॅक्टर क्रमांक MH 42 Q 2644 व त्यास जोडलेल्या चारचाकी ट्रॉली क्रमांक MH 42 BS 2120 मध्ये डॉल्बी संगीताच्या तालावर महिला नृत्यांगणांकडून सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव, अंगविक्षेप व बिभत्स नृत्य केले जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
या प्रकाराला मंडळाचे पदाधिकारी व संबंधित व्यक्तींकडून प्रोत्साहन देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच विसर्जन मिरवणुकीच्या अनुषंगाने मंडळाच्या अध्यक्षांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६८ अन्वये देण्यात आलेल्या नोटीसमधील निर्देशांचे उल्लंघन झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
याप्रकरणी राधा संग्राम घुले (वय २९), मिनाक्षी बापुराव रुपनवर (वय ३५), काजल नितीन शिंदे (वय २६), तिघी रा. लाकडी, ता. इंदापूर व रोहित हणमंत धुमाळ, रा. गोखळी, ता. फलटण (डॉल्बी मालक) तसेच राहुल दिलीप माळशिकारे, दीपक सुभाष माळशिकारे आणि निखील जालिंदर माळशिकारे, तिघे रा. माळशिकारेवाडी, कोहाळे बुद्रुक यांच्याविरुद्ध वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम २९६, २२३, ३(५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम ११०, ११७ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अझर मुलाणी करीत आहेत.
गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शासन तसेच पोलीस प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन वडगाव निंबाळकर पोलिसांकडून करण्यात आले आहे.
