मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 24 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 24 September 2026 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

मु.सा. काकडे महाविद्यालयात आविष्कार स्पर्धा संपन्न

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
September 24, 2026 1 मिनिट वाचन 3,501 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

सोमेश्वरनगर :
मु.सा. काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर येथे महाविद्यालयीन स्तरावरील आविष्कार संशोधन स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या स्पर्धेचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले होते. सदर स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी 42 संशोधन प्रकल्प सादर केले. या नावीन्यपूर्ण उपक्रमाद्वारे महाविद्यालयातील तरुण संशोधकांना त्याचे प्रकल्प आणि कल्पना सादर करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ मिळाले. सदरच्या स्पर्धेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ.धनंजय मंडलिक यांच्या शुभहस्ते झाले. त्यांनी आपल्या मनोगतमध्ये चाणक्य नीति व मानवी मूल्ये यांची सांगड घालत संशोधनाचे मानवी जीवनातील महत्त्व स्पष्ट केले. स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आविष्कार संशोधन स्पर्धा समितीचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.देविदास वायदंडे हे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये आजच्या बदलत्या युगामध्ये टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण होणे व त्यांनी केलेले संशोधन समाज हिताचे ठरणे काळाची गरज आहे असे मत व्यक्त केले तसेच आविष्कार संशोधन स्पर्धेचा उद्देश व विद्यार्थ्यांच्या जीवनातील या स्पर्धेचे महत्त्व स्पष्ट केले. या स्पर्धेसाठी तज्ञ परीक्षक म्हणून सोमेश्वरनगर येथील शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. संजय देवकर व नवसह्याद्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन, पुणे येथील प्रा.डॉ. प्रमोद जाधव हे उपस्थित होते. या स्पर्धे प्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व संशोधक विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. सदरच्या स्पर्धेचे प्रास्ताविक प्रा.डॉ. श्रीकांत घाडगे यांनी केले तर प्रा.नीलिमा निगडे यांनी आभार मानले.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख