• Home
  • माझा जिल्हा
  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तरडोली गावात विविध कामांचे भूमिपूजन
Image

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तरडोली गावात विविध कामांचे भूमिपूजन

प्रतिनिधी

तरडोली पाझर तलाव जोड प्रकल्प शेतीसाठी उपयुक्त ठरेल-उपमुख्यमंत्री अजित पवार

पुरंदर उपसा सिंचन योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या तरडोली पाझर तलाव जोड प्रकल्पामुळे तरडोली परिसरातील शेतीला पाणी मिळून ते शेतीसाठी वरदान ठरेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून भोईटेवाडी येथे सुरु केलेल्या पुरंदर उपसा सिंचन योजना अंतर्गत तरडोली पाईप लाईन जोडप्रकल्पाचे उद्धघाटन करण्यात आले.

यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, सा. बां. पूर्व विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, उपअभियंता सा.बां. (वैद्यकीय) रामसेवक मुखेकर, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे सिद्धार्थ इंगळे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर,

सोमेश्वर सह. साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरषोत्तम जगताप, जिल्हा परिषद व्यवस्थापन समितीचे सदस्य हनुमंत भापकर, सरपंच विद्या भापकर आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. पवार म्हणाले, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून केलेल्या १ किलोमीटर लांबीच्या पाइपलाइनमुळे तरडोली परिसरातील शेतीच्या पाण्याची मागणी कमी होणार आहे.

पावसाचे प्रमाण कमी असलेल्या कालावधीत या तलावातील पाणी उपयोगी पडेल. जिल्हा परिषद आणि नाम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ११४ गाळमुक्त लघु पाटबंधारे प्रकल्प योजना सुरू करण्यात आल्या आहेत. हे प्रकल्प उपयुक्त ठरणार असून शेतीला पुरेसे पाणी मिळेल, असे श्री.पवार म्हणाले. त्यांनी या कामाबद्दल टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनिबद्दल गौरवोद्गार काढले.

शेतकऱ्यांनी केवळ ऊस पीक न घेता कमी पाणी लागणारी पिके घ्यावीत. या पिकातूनही चांगले उत्पादन मिळते. राज्य शासनाच्यावतीने विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात. त्याचा लाभ सर्वांना मिळावयास हवा. सार्वजनिक विकासकामे करताना कामे गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ असावीत. कामे वेळेत पूर्ण होईल याकडेही लक्ष द्यावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तरडोली येथील २५ लाख रुपयांच्या समाज मंदिर बांधकामाचे भूमिपूजनही करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, नागरिक उपस्थित होते.

Releated Posts

सतीश भैया कल्याणकारी संघाच्या वतीने जेष्ठ नागरिक व बारा वर्षे पुढील मुली व महिलांसाठी एसटी बसचा पास काढणे शिबिर आयोजन.

प्रतिनिधी  बारामती. निंबुत येथे सतीश भैय्या कल्याणकारी संघ यांच्या वतीने निंबुत गावातील बारा वर्षावरील मुली, व महिलांसाठी एसटी…

ByBymnewsmarathi Jun 19, 2026

सोमेश्वर विद्यालयात नवागतांचे स्वागत

मोरगाव – प्रतिनिधी सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयात पाचवीच्या वर्गात दाखल झालेल्या नवीन विद्यार्थ्यांचे…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ; जलसंधारण व शेती विकासाला नवी गती

सहसंपादक – अक्षय थोरात खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री…

ByBymnewsmarathi Jun 10, 2026