मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Thursday, 20 August 2026
|
महाराष्ट्र: ...
बाजार: SENSEX 81,100 ▲ NIFTY 24,800 ▲
M NEWS MARATHI

अन्याया विरुद्ध आवाज उठवणारा एकमेव चॅनल

प्रेरणादायी निरंकारी साधे विवाह दिव्य युगुलाच्या पावन सान्निध्यात ४५ जोडपी विवाहबद्ध

mnewsmarathi प्रतिनिधी
January 31, 2024 1 मिनिटांचे वाचन 5001 वेळा पाहिले

प्रतिनिधी

            निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन सान्निध्यात सोमवार, दि.२९ जानेवारी रोजी नागपुरच्या मिहान जवळ आयोजित केलेल्या ५७व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या जागेवर एकंदर ४५ जोडपी विवाहबद्ध झाली.

            नव विवाहित वधूवरांना सदगुरु माताजींनी गृहस्थ जीवन भक्ति करत व्यतीत करण्यासाठी आशीर्वाद प्रदान केला तसेच निरंकारी पद्धतीने साधे विवाह करण्याची निवड केल्याबद्दल त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.

            या सामूहिक विवाह कार्यक्रमात वधूवरांनी पारंपारिक जयमाला (वरमाला) एकमेकांच्या गळ्यात घातल्या. याशिवाय निरंकारी विवाहाचे विशेष चिन्ह सामायिक हार निरंकारी मिशनच्या प्रतिनिधींनी प्रत्येक जोडप्याला परिधान केले. लांवांच्या (मंगलाष्टका) दरम्यान सद्गुरु माताजी व राजपिताजी यांनी वधूवरांवर पुष्पवर्षाव करुन आपला आशीर्वाद प्रदान केला. त्याचप्रमाणे वधूवरांच्या कुटुंबियांनीही त्यांच्यावर पुष्पवर्षाव केला. हे दृश्य खरोखरच अलौकिक होते.

            आजच्या या शुभ प्रसंगी महाराष्ट्रासह इतर राज्यांतून एकंदर ४५ जोडपी विवाहबद्ध झाली. त्यामध्ये मुंबई, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी नगर, बुलढाणा, चंद्रपुर, चिपळूण (रत्नागिरी), धुळे, डोंबिवली, गडचिरोली, जालना, कोल्हापुर, नागपुर, पालघर, पुणे सोलापुर, ठाणे, वर्धा आणि वाशिम या जिल्ह्यांसह मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान व उत्तर प्रदेश या राज्यांतील वधूवरांचा समावेश होता.

           सामूहिक विवाह संपन्न झाल्यानंतर सर्वांसाठी भोजनाची उचित व्यवस्था समागम स्थळावर करण्यात आली. उल्लेखनीय आहे, की या साध्या पद्धतीच्या सामूहिक विवाह सोहळ्यात अनेक पदवीधर, पदव्यूत्तर पदवीधर तसेच उच्च शिक्षित नवजवान व नवयुवतींचा समावेश होता. काही परिवार असेही होते जे आपल्या मुलांचे विवाह मोठ्या थाटामाटात करु शकले असते. परंतु सद्गुरुच्या पावन छत्रछायेत त्यांची दिव्य शिकवण धारण करुन साध्या पद्धतीने विवाह करण्याचे एक आदर्श उदाहरण त्यांनी प्रस्तुत केले.

           नि:संदेह साध्या विवाहांचे हे अलौकिक दृश्य जाती, वर्ण इत्यादिंची विषमता दूर करुन एकत्वाचा सुंदर संदेश प्रस्तुत करत होते जो निरंकारी मिशनचा संदेश देखील आहे.

mnewsmarathi

हे लेखक M NEWS MARATHI साठी उत्कृष्ट पत्रकारिता करत आहेत.

सर्व लेख पहा