• Home
  • माझा जिल्हा
  • रत्नागिरी ! राजापूर तालुक्यातील रिफायनरी समर्थकांची बैठक संपन्न.
Image

रत्नागिरी ! राजापूर तालुक्यातील रिफायनरी समर्थकांची बैठक संपन्न.

प्रतिनिधी –

प्रकल्पाच्या माध्यमातून नाणार आणि बारसू या दोन्ही भागाचा प्रकल्पाच्या माध्यमातून विकास करण्यात यावा.

२० एम.एम.टी.पी.ए .एवढा संकुचित न करता ६० एम. एम.टी.पी. ए. एवढा पूर्ण क्षमतेचा प्रकल्प नाणार आणि बारसू धोपेश्र्वर परिसरात राबवण्यात यावा.

नाणार – बारसू रिफायनरी प्रकल्प समर्थन समन्वय समिती या बॅनर खाली एकत्र लढा देण्याचा निर्णय घेण्यात आला.

राजापूर तालुक्यातील रिफायनरी प्रकल्प समर्थकांची आज रविवारी बैठक कावतकर बंगला येथे आयोजित करण्यात आली होती. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात सदरची बैठक संपन्न झाली. मागील वर्षभरापासून अशा प्रकारची बैठक आयोजित करण्यात आली नव्हती. त्यामुळे आज रोजी पार पडलेल्या बैठकीला चांगली समर्थकांची संख्या होती. या बैठकीवेळी मागील पाच सहा वर्षांपासून प्रत्येक रिफायनरी समर्थक कशा प्रकारे समर्थन करत आहे याबाबत मनोगत व्यक्त केले. रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करत असताना येणारे अनुभव सांगितले.

या बैठकीवेळी नाणार आणि बारसू या दोन्ही भागाचा प्रकल्पाच्या माध्यमातून विकास करण्यात यावा असे सर्वानुमते ठरले. २० एम एम टी पी ए एवढा संकुचित न करता ६० एम एम टी पी ए एवढा पूर्ण क्षमतेचा प्रकल्प नाणार आणि बारसू धोपेश्र्वर परिसरात राबवण्यात यावा असे सर्वानुमते ठरले. राजापूर तालुक्यात बेरोजगारीची प्रमुख समस्या असून ही समस्या सोडवण्यासाठी रिफायनरी सारखे प्रकल्प राजापूर तालुक्यात आले पाहिजेत आणि या सगळ्या चांगल्या प्रकल्पांचे सर्वांनी समर्थन केले पाहिजे असे ठराव झाला. सदर नवीन भूमिका घेऊन नाणार बारसू रिफायनरी प्रकल्प समर्थक समन्वय समिती स्थापन करण्याचे ठरले. तसेच लवकरात लवकर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांची भेट घेण्याचे ठरले आणि त्यांना निवेदन सादर करण्याचे ठरले.

या बैठकीवेळी ॲड. कावतकर, निलेश पाटणकर, अविनाश महाजन, पुरुषोत्तम खांबल, सौ.लक्ष्मी शिवलकर, सिद्धेश मराठे, अमोल सोगम, तन्मय महाजन, सुनील भनसारी, नाटेचे संतोष चव्हाण, ऐजाज बांगी, जयंत कदम, विनायक कदम, फारुख साखरकर, विद्याधर राणे, सूरज पेडणेकर, संदेश आंबेकर, माजी नगरसेवक प्रकाश आमकर, राजा काजवे, सतीश महाजन, अमर वारिषे, सुधीर आग्रे, सदाशिव तांबडे, हरिश्चंद्र शिर्के, स्वप्नील मांजरेकर, प्रल्हाद तावडे, सुरेश तावडे, एकनाथ खांबल, सुहास मराठे आदी मान्यवर, रिफायनरी प्रकल्प समर्थक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांचे आभार सिद्धेश मराठे यांनी मानले.

Releated Posts

यंदा बारामतीचे प्रदर्शन आठ दिवस ! कृषक प्रदर्शन शनिवारपासून; ११ वर्षांची परंपरा जपली

प्रतिनिधी बारामती अँग्रीकल्चरल -डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राचे यंदाचे कृषिप्रदर्शन ‘कृषक ‘२०२६ चे आयोजन केले असून १७…

ByBymnewsmarathi Jan 12, 2026

सोमेश्वर अदा करणार विना कपात ऊस बिले. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप.

प्रतिनिधी शासन नियमानुसार या गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ.आर.पी) रु.३२८५/- प्र.मे.टन इतका निघत…

ByBymnewsmarathi Jan 9, 2026

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे येथे एस टी – दुचाकी अपघातात दोन तरुण ठार

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे दरम्यान हॉटेल मयुरी नजीक एस टी बस व दुचाकीच्या अपघातात दोन तरुणांना जीव गमवावा…

ByBymnewsmarathi Jan 4, 2026

मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा अभियान २०२५–२६ संपन्न

सोमेश्वरनगर :सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने “रस्ते सुरक्षा…

ByBymnewsmarathi Dec 23, 2025