मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
इतर

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी हा सांस्कृतिक दहशतवाद – प्राचार्य महेंद्र कदम

mnewsmarathi 04 Dec 2022 1 मिनिट वाचन 9,702 वाचन

कदममुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै.मुगुटराव साहेबराव काकडे देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त ०१ / १२ / २०२२ ते ०३/ १२ / २०२२ दरम्यान तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. दि. ०२/१२/२०२२ रोजी व्याख्यानमालेच्या दुसर्‍या दिवशी ‘सांस्कृतिक दहशतवादाचे राजकारण ‘ या विषयावर प्राचार्य.डाॅ. महेंद्र कदम यांनी विचार मांडले. भारतीय संस्कृती व परंपरा यांचा नव्याने अन्वयार्थ लावणे गरजेचे आहे. हिंदू संस्कृतीचे डोळसपणे आकलन करणे , स्रियांचे शोषण करणार्‍या अनावश्यक प्रथा – परंपरा नाकरणे गरजेचे आहे. व्यवस्थेला प्रश्न विचारणारा नको असतो. त्यामुळे आज लेखक ,विचारवंत , पत्रकार जे व्यवस्थेला प्रश्न विचारतात यांचा आवाज दाबला जातो हा सांस्कृतिक दहशतवाद आहे. रविशकुमारच्या राजिनामा सोशल मिडियावर चर्चेत आहे पण प्रत्यक्ष रस्त्यावर त्याची म्हणावी अशी प्रतिक्रिया उमटत नाही हे दूर्दैवी आहे. असे मत त्यांनी मांडले. पुरोगामी , प्रागतिक विचारच देशाला पुढे घेवून जाईल ही भूमिका त्यांनी मांडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे संचालक श्री.राहुल काकडे देशमुख हे होते. प्राचार्य डाॅ देविदास वायदंडे यांनीही याप्रसंगी मनोगत व्यक्त करून कै.मुगुटराव आप्पांच्या स्मृतींना उजाळा देवून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडून सांगितले. सहसचिव श्री . सतीश लकडे हे व्यासपिठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. प्रवीण ताटे देशमुख यांनी केले. त्यामध्ये कै.मुगुटराव काकडे देशमुख यांच्या कार्याचा आढाव घेवून त्यांची सामान्य जनतेविषयीची तळमळ, त्यांचं सहकार, राजकारण, शैक्षणिक क्षेत्रातील योगदान यावर त्यांनी प्रकाश टाकला. याप्रसंगी सर्व प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. डाॅ.संजू जाधव यांनी आभार मानले. दि. ०१/१२/२०२२ रोजी व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी ‘मानवी मूल्ये आणि शिक्षण ‘ या विषयावर प्रा.डाॅ. कान्हू गिरमकर यांनी विचार मांडले. भारत हा बहुसांस्कृतिक व बहुभाषिक देश आहे , विविधतेत एकता हे भारताचे सामर्थ्य आहे. लोकशाहीमध्ये विरोधी मताचा आदर करणे महत्त्वाचे आहे, आपल्या विरोधी विचार मांडणारा देशद्रोही ठरविणे चुकीचे आहे अशी भूमिका त्यांनी मांडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री.अभिजित काकडे देशमुख हे होते. त्यांनी कै . मुगुटराव आप्पांच्या स्मृतींना अभिवादन करून व्याख्यानमालेस शुभेच्छा दिल्या. प्राचार्य डाॅ देविदास वायदंडे यांनीही याप्रसंगी मनोगत व्यक्त करून कै.मुगुटराव आप्पांच्या स्मृतींना उजाळा देवून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडून सांगितले. सहसचिव श्री . सतीश लकडे हे व्यासपिठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. प्रवीण ताटे देशमुख यांनी केले. त्यामध्ये कै.मुगुटराव काकडे देशमुख यांच्या कार्याचा आढाव घेवून त्यांची सामान्य जनतेविषयीची तळमळ, त्यांचं सहकार, राजकारण, शैक्षणिक क्षेत्रातील योगदान यावर त्यांनी प्रकाश टाकला. तर डाॅ.नारायण राजूरवार यांनी आभार मानले. दि. ०३/१२/२०२२ रोजी व्याख्यानमालेच्या समारोप प्रसंगी ‘ सामाजिक जबाबदारी व समकाल ‘ या विषयावर प्राचार्य डाॅ. पंडीत शेळके यांनी विचार मांडले. समाजातील माणसाचं जगणं सुकर करण्यासाठी प्रत्येक माणसाने जबाबदारीने वागले पाहिजे. पर्यावरण , स्वच्छता , आरोग्य , रस्ते सुरक्षा , स्वावलंबी जीवन या विषयाच्या अनुषंगाने प्रत्येकाने आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली तर नक्कीच नौसर्गिक स्रोत जिवंत ठेवून आपण माणसाचं जगणं सुकर करू शकतो अशी भूमिका मांडली . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे संचालक प्रा. विलासराव बोबडे हे होते. प्राचार्य डाॅ देविदास वायदंडे यांनीही याप्रसंगी मनोगत व्यक्त केल. सामाजिक बांधिलकी व सामाजिक उत्तरदायित्व याची जाणीव प्रत्येक विद्यार्थ्याने ठेवावी असे अवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. प्रवीण ताटे देशमुख यांनी केले. याप्रसंगी सर्व प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. डाॅ.संजू जाधव यांनी आभार मानले.प्रा.डॉ. प्रवीण ताटे देशमुखउपप्राचार्य व समन्वयक

लेखक

mnewsmarathi

M News Marathi