मुख्य मजकुरावर जा
Thursday, 27 August 2026

बारामती ! वडगाव निंबाळकर मध्ये वाढत्या रोगराईला आळा घालण्यासाठी ग्रामपंचायत तर्फे औषध फवारणी .

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
September 14, 2024 1 मिनिट वाचन 8,507 वाचन

प्रतिनिधि – फिरोज भालदार

वडगाव निंबाळकर येथे रोगराईला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वडगाव निंबाळकर परिसरात वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत तर्फे औषध फवारणी करण्यात आली. वाढत्या लोकसंख्येमुळे मोठ्या प्रमाणात लोकवस्तीत वाढ होत आहे यावर्षी समाधानकारक पाऊस व सध्या सतत पावसामुळे विविध प्रकारची गवत उगवले असून कचरा, सांडपाणी आणि हवामानातील सततच्या बदलामुळे सर्वत्रच साथीचे रोग आजाराणे डोके वर काढले आहेत.

अंगदुखी, सर्दी, खोकला, ताप, डेंगू , चिकनगुनिया तसेच पावसाने उगवलेल्या विविध प्रकारच्या गवताने व तसेच साचलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने अनेकांना आजाराला बळी पडावे लागत आहे . यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत यांकडून औषध फवारणी ही मोहीम राबवण्यात येत आहे.

वडगाव निंबाळकर गावचे सरपंच सुनील ढोले व ग्रामसेवक अनिल हिरास्कर यांचे मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत कर्मचारी राजू चव्हाण , बालगुडे यांनी ही औषध फवारणी करून घेतली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य व सर्व ग्रामस्थ यांनी सहकार्य केले .

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख