• Home
  • क्राईम
  • कौटुंबिक वादातून महिलेचा खून; सहा वर्षांच्या मुलाला घेऊन पती पसार
Image

कौटुंबिक वादातून महिलेचा खून; सहा वर्षांच्या मुलाला घेऊन पती पसार

प्रतिनिधी

कौटुंबिक वादातून महिलेचा खून करण्यात आल्याची घटना हडपसर भागातील शिंदे वस्ती परिसरात घडली.

याप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेचा खून केल्यानंतर सहा वर्षांच्या मुलाला घेऊन पती पसार झाल्याचे उघडकीस आले आहे.

आरती देबीलाल सरेन (वय ३२, सध्या रा. शिंदे वस्ती, हडपसर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती देबीलाल लक्ष्मणचंद्र सरेन (वय ४०) याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत दत्तात्रय शंकर चौधरी (वय ५५, रा. तुकाई दर्शन, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सरेन दाम्पत्य मूळचे पश्चिम बंगालमधील आहे. ते हडपसर परिसरातील शिंदे वस्ती परिसरातील दत्तात्रय चौधरी यांच्या चाळीत राहायला आहे.

आरोपी देबीलाल आणि त्याची पत्नी आरती मजूरी करतात. त्यांना सहा वर्षांच्या मुलगा आहे.

सरेन दाम्पत्यात गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक कारणावरुन वाद व्हायचे. शुक्रवारी मध्यरात्री त्यांच्यात वाद झाला. भांडणाचा आवाज शेजाऱ्यांनी ऐकला.

देबीलालने पत्नी आरतीचे डोके भिंतीवर आपटले, तसेच तिच्या डोक्यात कठीण वस्तूने प्रहार केला. आरतीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पहाटे सहा वर्षांचा मुलगा आर्यन याला घेऊन आरोपी देबीलाल घरातून पसार झाला.

शनिवारी सकाळी सरेन यांच्या खोलीचा दरवाजा उघडा असल्याचे शेजाऱ्यांनी पाहिले. आरती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर खोली मालक चौधरी यांनी या घटनेची माहिती पोलिसांनी दिली, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक विलास सुतार यांनी दिली.

Releated Posts

दोन गावठी पिस्तूल, एक रायफलसह आरोपी जेरबंद; माळेगाव पोलिसांची धडक कारवाई

प्रतिनिधी माळेगाव पोलिसांनी अवैध शस्त्रास्त्रांविरोधात कारवाई करत दोन गावठी पिस्तूल, एक रायफल, दोन जिवंत काडतुसे तसेच दोन काडतुसांचे…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

रागाच्या भरात नातवाने आजोबांचा लोखंडी गजाने केला खून; आरोपी नातू पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी   शिरूर तालुक्यातील बाभुळसर बुद्रुक येथे शेतातील व घरातील कामे सांगितल्याच्या रागातून २६ वर्षीय नातवाने ८४ वर्षीय…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

बारामतीत म्हशींच्या 12 रेडकांची क्रूर वाहतूक उघड; पिकअपसह चालकावर गुन्हा दाखल

सहसंपादक- अक्षय थोरात बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी परिसरात म्हशींच्या रेडकांची कथितपणे क्रूर व बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी माळेगाव पोलिसांनी एका…

ByBymnewsmarathi Jun 14, 2026

ऑनलाईन गेमिंगच्या आमिषाने लाखोंची फसवणूक; पुणे पोलिसांनी मोठ्या सायबर रॅकेटचा पर्दाफाश

प्रतिनिधी ऑनलाईन गेम खेळून अल्पावधीत मोठी कमाई करून देण्याचे आमिष दाखवत नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या मोठ्या सायबर…

ByBymnewsmarathi Jun 13, 2026