• Home
  • माझा जिल्हा
  • बारामती तालुक्यामध्ये निकालाच्या अगोदरच अजित पवार यांच्या विजयाचे बॅनर झळकले. कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह.
Image

बारामती तालुक्यामध्ये निकालाच्या अगोदरच अजित पवार यांच्या विजयाचे बॅनर झळकले. कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह.

प्रतिनिधी – फिरोज भालदार

बारामती तालुक्यात विधानसभा निवडणूकीला सर्व पक्षांकडून जोर असताना दिसला . आता मात्र सर्वांचे लक्ष्य निकालावर लागले आहे . यातच बारामती तालुक्यात सर्वत्र अजित पवार यांचे आमदार पदी निवड झाल्याबद्दल व फिक्स मुख्यमंत्री असे शुभेच्छांचे बॅनर लागलेले दिसत आहेत.

यावेळी विधानसभा निवडणुकीत देखील पवार विरुद्ध पवार अशी लढत होताना दिसत आहे . यामध्ये कोणते पवार विजयाची बाजी मारणार याकडे मतदारांचे लक्ष्य लागले आहे . बारामती तालुक्यात सर्वत्र घड्याळ आणि तुतारी वाजवणारा माणूस यांचा प्रचार जास्त होताना दिसला .

आता मतदार कोणाला निवडून देणार ? बारामती मतदार संघाचा आमदार कोण होणार? याकडे सर्व मतदारांचे लक्ष्य वेधून घेतले आहे. बारामती तालुक्यातील खंडोबाची वाडी या ठिकाणी देखील अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार फिक्स आमदार अशा आशयाचे अनेक बॅनर लावल्यामुळे निकालाच्या अगोदरच एक दिवस कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.यामध्ये निकलापूर्वीच बारामती तालुक्यातील सर्व गावांमध्ये अजित पवार यांचे मोबाईलवर विजयाचे स्टेटस , गावोगावी शुभेच्छांचे बॅनर लागल्याचे दिसत आहे.

Releated Posts

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या धर्मशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन.

उपसंपादक- अक्षय थोरात  मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी उभारलेली ही सुसज्ज धर्मशाळा हजारो वारकऱ्यांसाठी हक्काचा निवारा ठरेल आणि…

ByBymnewsmarathi Jul 4, 2026