• Home
  • माझा जिल्हा
  • सोमेश्वर कारखान्याने पहिली उचल ३३००/- रू. प्रती मे.टन जाहिर करावी तसेच गाळपास येणारा गेटकेन उस तात्काळ बंद करावा: श्री सतिशराव काकडे
Image

सोमेश्वर कारखान्याने पहिली उचल ३३००/- रू. प्रती मे.टन जाहिर करावी तसेच गाळपास येणारा गेटकेन उस तात्काळ बंद करावा: श्री सतिशराव काकडे

प्रतिनिधी

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या हंगाम २०२४-२५ दि.१५/११/२०२८ पासून मुम होवुन कारखान्याने ३१ दिवसांमध्ये जवळपास २ लाख ६५ हजार मे.टन गाळप पूर्ण करून मगसरी १०.८० रिकव्हरी प्रमाणे २ लाख ७२ हजार साखर पोत्यांचे उत्पादन झालेले आहे. कारखान्याची आजची रिकव्हरी ११.६६ एवढी आहे. तरी देखील सोमेश्वर कारखान्याने पहिली उचल अद्यापपर्यंत जाहिर केलेली नाही ही खेदाची बाब आहे. वास्तविक चेअरमन, संचालक मंडळ व कार्यकारी संचालक सभासदांना जाणीव पुर्यक वेठीस धरून कारखाना सभासदांच्या उसाचे बिनव्याजी कोट्यावधी रूपये सालाबाद प्रमाणे वापरत आहे. परंतु दुसऱ्या बाजुला मात्र सभासदांच्या सोसायटीचे व्याज चालु आहे हे चेअरमन व संचालक मंडळ विमलेले दिसते. सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन मागील काही वर्षापासुन पहिली उचल व अंतिम भाव जाहिर करून त्याचे श्रेय स्वतः घेत आलेले आहेत. मग आत्ता यावर्षी त्यांची बोबडी का बंद आहे. कोल्हापुर जिल्ह्यातील बहुतांश सर्व साखर कारखान्यांनी पहिली उचल ३२००/- रू. प्रती मे.टन जाहिर करून काही कारखान्यांनी उस बिले देण्यासही सुरूवात केलेली आहे.

वास्तविक कोल्हापुर जिल्ह्यातील बहुतांश कारखान्याची रिकव्हरी सोमेश्वर कारखान्यापेक्षा थोडी जास्त असली तरी त्या कारखान्याचे कशिंग, साखरपोती व अंतिम बिल सोमेश्वर कारखान्यापेक्षा कमी आहे. उलट सोमेश्वर कारखान्याचे उच्चांकी कशिंग, चांगला साखर उतारा, उच्चांकी साखरपोती, जादाचे उपपदार्थ उत्पादन व विज निर्मितीमध्ये आग्ग्रेसर असल्याने कारखान्याने मागील काही वर्षापासुन उच्चांकी अंतिम दर दिलेला आहे. मग कारखान्याची आर्थिक परिस्थिती चांगली असतानाही चेअरमन सन २०२४-२५ ची पहिली उचल जाहिर न करता मुग गिळून गप्प का आहेत? तरी चालु गळीत हंगामाची पहिली उचल एकरक्कमी ३३००/- रू. प्रति मे.टन तात्काळ जाहिर करून सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग करावी.

सोमेश्वर कारखान्याच्या चेअरमन यांनी गेल्या वर्षी केलेल्या उत्कृष्ठ उस तोडीचे नियोजन पाहता महाराष्ट्र राज्यामध्ये दुष्काळी परिस्थिती असतानाही सभासदांच्या उस तोडी २१ ते २२ महिने लांबवुन सभासदांचे आर्थिक नुकसान करून गेटकेन उस मोठ्या प्रमाणात गाळप करून सभासदांची जिरवीण्यासाठी गाळपाचा उच्चांक निर्माण केला होता. त्याच पध्दतीने या वर्षीही चेअरमन यांनी उस तोडीचे नियोजन करून दिवसाला अंदाजे १५०० ते १८०० मे.टन उस गाळपास आणुन आत्तापर्यंत सुमारे ४० हजार मे.टन गेटकेन उस गाळपास आणलेला आहे. परिणामी सभासदांच्या उस तोडी लांबत असुन उसाचे वजन घटत आहे तसेच दुबार पिकही बुडत आहे. मग चेअरमन यांनी विस्तारवाढ गेटकेन धारकांसाठी केली आहे का सभासदांसाठी केली आहे किंवा इतर कोणाचा फायदा करण्यासाठी केली आहे याचा खुलासा करावा. तरी चेअरमन यांनी तात्काळ १०० टक्के गेटकेन उसाचे गाळप बंद करावे कारण आज साखरवाडी भागामध्ये ३१००/- ते ३२००/- रू. प्रती मे.टन काटा पेमेंट दिले जात आहे. त्यामुळे सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील मोठ्या प्रमाणात उस बाहेरील कारखान्यांकडे गाळपास चाललेला आहे. म्हणजेच गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षीही कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील मोठ्या प्रमाणात उस बाहेरील कारखान्यांना गाळपास जाईल असे दिसते. त्यामुळे चेअरमन यांनी गेटकेन उसाचे गाळप तात्काळ बंद करून सभासदांच्या उस गाळपास प्रथम प्राधान्य द्यावे.

तरी श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने सन २०२४-२५ या गाळप हंगमाची पहिली उचल एकरक्कमी ३३००/- रू. प्रती मे.टन तात्काळ जाहिर करून गाळप झालेल्या उसाचे बिल सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग करावे. तसेच कारखान्यामध्ये गाळपास येणारा गेटकेन उस तात्काळ १०० टक्के बंद करावा. चेअरमन, संचालक मंडळ व कार्यकारी संचालक यांनी एक आठवड्‌यामध्ये गेटकेन उसाचे गाळप बंद न केल्यास शेतकरी कृती समितीस मोर्चा काढुन काटा बंद आंदोलन करावे लागेल व त्यावेळी काही अनुचीत प्रकार घडुन कारखान्यास आर्थिक तोषिश लागल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी चेअरमन, संचालक मंडळ व कार्यकारी संचालक यांची राहिल याची नोंद घ्यावी.

Releated Posts

यंदा बारामतीचे प्रदर्शन आठ दिवस ! कृषक प्रदर्शन शनिवारपासून; ११ वर्षांची परंपरा जपली

प्रतिनिधी बारामती अँग्रीकल्चरल -डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राचे यंदाचे कृषिप्रदर्शन ‘कृषक ‘२०२६ चे आयोजन केले असून १७…

ByBymnewsmarathi Jan 12, 2026

सोमेश्वर अदा करणार विना कपात ऊस बिले. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप.

प्रतिनिधी शासन नियमानुसार या गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ.आर.पी) रु.३२८५/- प्र.मे.टन इतका निघत…

ByBymnewsmarathi Jan 9, 2026

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे येथे एस टी – दुचाकी अपघातात दोन तरुण ठार

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे दरम्यान हॉटेल मयुरी नजीक एस टी बस व दुचाकीच्या अपघातात दोन तरुणांना जीव गमवावा…

ByBymnewsmarathi Jan 4, 2026

मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा अभियान २०२५–२६ संपन्न

सोमेश्वरनगर :सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने “रस्ते सुरक्षा…

ByBymnewsmarathi Dec 23, 2025