• Home
  • माझा जिल्हा
  • सारथीमार्फत दिवाणी न्यायाधीश व प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी पदांसाठी नि:शुल्क प्रशिक्षणाचे आयोजन
Image

सारथीमार्फत दिवाणी न्यायाधीश व प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी पदांसाठी नि:शुल्क प्रशिक्षणाचे आयोजन

प्रतिनिधी.

पुणे, दि. १८ : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे यांच्यामार्फत मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी पदांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या न्यायिक सेवा परीक्षेमार्फत दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्याय दंडाधिकरी (MPSC CID & JMFC) यांची निवड केली जाते. त्यातील काही दंडाधिकाऱ्यांना कालांतराने उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बढती मिळते. मराठा व कुणबी समाजातील होतकरु विद्यार्थ्यांना या परिक्षेच्या अभ्यासाकरिता प्रोत्साहन मिळावे यासाठी सारथी संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना ११ महिने कालावधीसाठी प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यासाठी प्रशिक्षणार्थ्यांना दरमहा रु.१० हजार मासिक हजेरीच्या आधारे विद्यावेतन व आकस्मिक खर्च म्हणून एकवेळ रु.१२ हजार अदा करण्यात येणार आहेत. तसेच प्रशिक्षणाचे संपूर्ण शुल्क सारथी संस्थेमार्फत देण्यासंदर्भात संचालक मंडळाने निर्णय घेतला आहे. ११४ विद्यार्थी या प्रशिक्षणाचा लाभ घेणार आहेत. हे प्रशिक्षण मराठवाडा मित्र मंडळ शंकरराव चव्हाण लॉ कॉलेज, पुणे, स्पेक्ट्रम अकेडमी, नाशिक व संकल्प एज्युकेशन, छत्रपती संभाजीनगर या प्रशिक्षण वर्गामार्फत राबविले जाणार आहे.

महाराष्ट्रातून दरवर्षी हजारो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विविध पदांसाठी अर्ज करत असतात योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षण घेऊन ध्येय प्राप्त करण्यासाठी “सारथी” ने उपलब्ध करुन दिलेल्या निशुल्क प्रशिक्षणाच्या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त विद्याच्यांनी लाभ घेऊन यश प्राप्त करावे असे आवाहन श्री. काकडे यांनी केले आहे. सदर प्रशिक्षण तुकडीस सारथी संस्थेचे अध्यक्ष श्री अजित निबाळकर, भा.प्र.से. (से.नि.) यांनी शुभेच्छा दिल्या असून सदर प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करण्याबाबत सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे.

Releated Posts

यंदा बारामतीचे प्रदर्शन आठ दिवस ! कृषक प्रदर्शन शनिवारपासून; ११ वर्षांची परंपरा जपली

प्रतिनिधी बारामती अँग्रीकल्चरल -डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राचे यंदाचे कृषिप्रदर्शन ‘कृषक ‘२०२६ चे आयोजन केले असून १७…

ByBymnewsmarathi Jan 12, 2026

सोमेश्वर अदा करणार विना कपात ऊस बिले. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप.

प्रतिनिधी शासन नियमानुसार या गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ.आर.पी) रु.३२८५/- प्र.मे.टन इतका निघत…

ByBymnewsmarathi Jan 9, 2026

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे येथे एस टी – दुचाकी अपघातात दोन तरुण ठार

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे दरम्यान हॉटेल मयुरी नजीक एस टी बस व दुचाकीच्या अपघातात दोन तरुणांना जीव गमवावा…

ByBymnewsmarathi Jan 4, 2026

मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा अभियान २०२५–२६ संपन्न

सोमेश्वरनगर :सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने “रस्ते सुरक्षा…

ByBymnewsmarathi Dec 23, 2025