• Home
  • माझा जिल्हा
  • बारामती ! प्रजासत्ताक दिनादिवशी विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीचे आमरण उपोषण.
Image

बारामती ! प्रजासत्ताक दिनादिवशी विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीचे आमरण उपोषण.

प्रतिनिधी –

बारामती विभागात होत असलेल्या बेकायदेशीर गौण खनिज उत्खननावर प्रशासनाने कारवाई करावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा युवक अध्यक्ष मंगलदास निकाळजे यांनी देशाच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनी बारामती प्रांताधिकारी कार्यालय , प्रशासकीय भवनासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.

बारामती परिसरात गौण खनिज उत्खनन करणारांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे, त्यावर सर्व काही दिसून ही डोळेझाक करणाऱ्या प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी आंदोलन करावे लागत आहे असे निकाळजे यांच्याशी बोलताना त्यांनी व्यक्त केले.

आंदोलनाच्या माध्यमातून पुढील मागण्या निकाळजे यांनी केल्या आहेत.

1) बारामती तालुक्यातील सर्व प्रकारचे बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन बंद करून संबंधितांवर कारवाई करणे.

2) जुनेद राजू झारी या युवकाचा मुरुमाची वाहतूक करणाऱ्या हायवा डंपरने चिरडल्याने त्यात त्याचा मृत्यू झाल्याने संबंधितांवर कारवाई करावी तसेच या युवकाला चिरडणाऱ्या हायवा ही वाहतूक बारामती औद्योगिक क्षेत्र टप्पा
क्र. R-2 या क्षेत्रातून करत असल्याने येथील पंचनामा करून पाचपट दंडाची कारवाई करण्यात यावी.

3) ए एस देशमुख अँड कंपनी यांनी बेकायदेशीर मुरूम उत्खनन केल्याने त्यांच्यावर पाचपट दंडाची कारवाई करण्यात यावी.

4) विजय पाटील तहसीलदार बारामती, व सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी यांनी शासनाची फसवणूक करून शासनाचा कर चुकवणाऱ्यांवर कारवाई न करता अर्ज निकाली काढल्याने त्यांच्यावर कारवाई करावी.

5) सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी त्यांच्याकडे काम करणारे ठेकेदार उत्खननाची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता उत्खनन करतात त्याची रॉयल्टी सार्वजनिक बांधकाम विभाग 5 पट कट करण्याऐवजी 1 पट कट करतात व बाकीचे 4 पट रॉयल्टी वसूल करून घेत नाहीत त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग यांना सक्तीचे आदेश करावे की, त्यांनी कोणत्याही प्रकारच्या रॉयल्टी कट करत असताना महसूल अधिकार्यांचा सल्ला घ्यावा व महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे पालन करून दंड वसूल करण्यात यावा.

या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा युवक अध्यक्ष मंगलदास निकाळजे यांनी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणास वडगाव निंबाळकर वंचित बहुजन आघाडीचे शाखाध्यक्ष आसिफ शेख , बारामती तालुकाध्यक्ष आर्यन साळवे, प्रतीक चव्हाण , अनुप मोरे , आदित्य कदम , शुभम मोरे, जितेंद्र कवडे, अक्षय गायकवाड , किसन मोरे , आदेश निकाळजे यांनी देखील पाठिंबा दर्शविला आहे.

Releated Posts

यंदा बारामतीचे प्रदर्शन आठ दिवस ! कृषक प्रदर्शन शनिवारपासून; ११ वर्षांची परंपरा जपली

प्रतिनिधी बारामती अँग्रीकल्चरल -डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राचे यंदाचे कृषिप्रदर्शन ‘कृषक ‘२०२६ चे आयोजन केले असून १७…

ByBymnewsmarathi Jan 12, 2026

सोमेश्वर अदा करणार विना कपात ऊस बिले. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप.

प्रतिनिधी शासन नियमानुसार या गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ.आर.पी) रु.३२८५/- प्र.मे.टन इतका निघत…

ByBymnewsmarathi Jan 9, 2026

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे येथे एस टी – दुचाकी अपघातात दोन तरुण ठार

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे दरम्यान हॉटेल मयुरी नजीक एस टी बस व दुचाकीच्या अपघातात दोन तरुणांना जीव गमवावा…

ByBymnewsmarathi Jan 4, 2026

मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा अभियान २०२५–२६ संपन्न

सोमेश्वरनगर :सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने “रस्ते सुरक्षा…

ByBymnewsmarathi Dec 23, 2025