बारामती ! वॉल कंपाउंड चे काम तात्काळ चालू न केल्यास मुस्लिम समाज करणार आमरण उपोषण – वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष राज कुमार

Uncategorized

प्रतिनिधी – फिरोज भालदार

बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम दफनभूमी वॉल कंपाऊंड साठी निधी उपलब्ध करण्यात आला होता. या निधीतून वॉलकंपाऊंडचे काम चालू झाले मात्र ९ ते १० महिने झाले हे काम अर्ध्यातच थांबवण्यात आले आहे अशी माहिती आसिफ शेख यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली .

यावरून वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष राज कुमार व वडगाव निंबाळकर शाखाध्यक्ष आसीफ शेख यांनी बारामती प्रांत कार्यालय प्रांताधिकारी वैभव नावडकर यांना निवेदन देऊन वॉल कंपाऊंडचे काम पूर्ण व्हावे अशी मागणी केली आहे. वॉल कंपाउंड चे काम तात्काळ चालू केले नाही तर समस्त मुस्लिम समाज वडगाव निंबाळकर यांच्यावतीने २० फेब्रुवारी २०२५ रोजी बारामती प्रांतकार्यालय येथे आमरण उपोषण करण्यात येईल असे जिल्हाध्यक्ष राज कुमार व शाखाध्यक्ष आसीफ शेख यांच्याकडून निवेदनामध्ये इशारा देण्यात आला आहे .

यावेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष राज कुमार , वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष आर्यन साळवे, वंचित बहुजन आघाडी वडगाव निंबाळकर शाखाध्यक्ष आसिफ शेख, स्पर्धा परीक्षा मंच संस्थापक अध्यक्ष शरीफ शेख, शाहिद शेख, वैभव तावरे, आदित्य कदम, रविराज लगड, गणेश जाधव, शोएब शेख उपस्थित होते.