Image

ओबीसी महामंडळाची एकरकमी परतावा योजना

 ओबीसी महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपूर्ण थकीत कर्ज रकमेचा एकरक्कमी भरणा करणाऱ्या लाभार्थीस थकीत व्याज रकमेत ५० टक्के सवलत देण्याबाबतची एकरक्कमी परतावा (ओटीएस) योजना ३१ मार्च २०२५ पर्यंत राबविण्यात येत असून महामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थीनी या योजनेचा लाभ घेवून कर्जमुक्त व्हावे असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एस.जे.पाटील यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि महामंडळ हे शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत असून या महामंडळाकडून इतर मागासवर्ग प्रवर्गातील व्यक्तींना स्वयंरोजगाराकरीता अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येते. महामंडळामार्फत थेट कर्ज योजना, वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना व गट कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येत आहेत. कर्ज योजनांची माहिती व ऑनलाईन अर्ज महामंडळाच्या www.msobcfdc.org या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत, असेही श्री. पाटील यांनी कळविले आहे.

Releated Posts

यंदा बारामतीचे प्रदर्शन आठ दिवस ! कृषक प्रदर्शन शनिवारपासून; ११ वर्षांची परंपरा जपली

प्रतिनिधी बारामती अँग्रीकल्चरल -डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राचे यंदाचे कृषिप्रदर्शन ‘कृषक ‘२०२६ चे आयोजन केले असून १७…

ByBymnewsmarathi Jan 12, 2026

सोमेश्वर अदा करणार विना कपात ऊस बिले. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप.

प्रतिनिधी शासन नियमानुसार या गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ.आर.पी) रु.३२८५/- प्र.मे.टन इतका निघत…

ByBymnewsmarathi Jan 9, 2026

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे येथे एस टी – दुचाकी अपघातात दोन तरुण ठार

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे दरम्यान हॉटेल मयुरी नजीक एस टी बस व दुचाकीच्या अपघातात दोन तरुणांना जीव गमवावा…

ByBymnewsmarathi Jan 4, 2026

मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा अभियान २०२५–२६ संपन्न

सोमेश्वरनगर :सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने “रस्ते सुरक्षा…

ByBymnewsmarathi Dec 23, 2025