बारामती ! बेकायदेशीर शस्त्रसाठ्यावर माळेगाव पोलिसांचा छापा; ७ घातक शस्त्रे जप्त “एकावर गुन्हा दाखल.
महत्त्वाचे मुद्दे
- १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
- २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
- ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.
प्रतिनिधी –
माळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बारवनगर येथे बेकायदेशीररीत्या घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी माळेगाव पोलिसांनी कारवाई करत तलवारी, कोयता, सत्तुर, सुरा आणि कुऱ्हाड अशी एकूण सात शस्त्रे जप्त केली. या कारवाईत दादा नथुराम शिंदे (रा. बारवनगर, ता. बारामती, जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार..
दि. १८ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास बारवनगर गावच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. दादा शिंदे यांच्या राहत्या घरासमोरील परिसरातून ही शस्त्रे जप्त करण्यात आली . त्याची एकूण अंदाजे किंमत १ हजार ६०० रुपये आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये तीन तलवारी, एक लोखंडी कोयता, एक लोखंडी सत्तुर, एक लोखंडी सुरा आणि लोखंडी पाते असलेली एक कुऱ्हाड यांचा समावेश आहे.
याप्रकरणी माळेगाव पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४ व २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैध परवानगीशिवाय घातक शस्त्रे बाळगल्याच्या प्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली. माळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत जून २०२६ पासून आतापर्यंत ४ अग्निशस्त्रे आणि १२ हत्यारे जप्त करण्यात आली असून याप्रकरणी एकूण ८ गुन्हे दाखल करून १३ आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि बारामती उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली माळेगाव पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे, संजय मोहिते तसेच पोलीस अंमलदार अजय अवघडे, वैभव मोहोळकर, विजय वाघमोडे, महेश पठारे, ज्ञानेश्वर मोरे, राजू शिंदे, अमोल वाघमारे आणि सागर पवार यांनी केली.
