बारावीच्या विद्यार्थ्यांना ‘या’ तारखेपासून परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध होणार

माझा जिल्हा

प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) बारावीची परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र राज्य मंडळाकडून २२ जानेवारी रोजी ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार असून, कनिष्ठ महाविद्यालयांनी कोणतेही शुल्क न घेता प्रवेशपत्राची प्रत विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यायची आहे.

राज्य मंडळाच्या सचिव डॉ. अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्य मंडळाने बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार २१ फेब्रुवारी ते २३ मार्च या कालावधीत लेखी परीक्षा होणार आहे, तर तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २ ते २० फेब्रुवारी या दरम्यान घेतली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाकडून २२ जानेवारीपासून प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे.