प्रतिनिधी – फिरोज भालदार
अलीकडेच राज्यातील विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणी आलेला दिसत आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ही अत्यंत महत्त्वाचा आहे अलीकडच्या काळामध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने काही अनुसूचित घटना घडल्या आहेत व घडत आहेत त्यामुळे विद्यार्थी व विद्यार्थिनींची सुरक्षा हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा बनला आहे.
बदलापूर येथील अत्याचाराचे प्रकरण ताजे असतानाच मागील काही काळात बारामती तालुक्यातील 2 मुलींवर दारूपाजून तब्बल 11 युवकांकडून अत्याचार केल्याची घटना पुणे हडपसर येथे घडलेली होती तसेच शाळकरी विद्यार्थ्यांच्या छेडछाडीचे प्रकरण हे बऱ्याच प्रमाणात पुढे येत आहेत. महाविद्यालय व शाळा यांपुढे आपल्या महागड्या दुचाकीच्या सायलेंसरच्या पुंगळ्या कडून रोडरोमिओ यांच्या घिरट्या थांबायचे नाव घेत नाहीत. पोलीस प्रशासनही यावर जाणीवपुर्वक डोळेझाक करत असल्याचे दिसून येत आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये नावलौकिक असलेले दामिनी पथक सुध्दा शाळा व महाविद्यालयांमध्ये जाऊन आदर सत्कार व भाषणे देण्यापूर्तेच शिल्लक राहिले आहे.
त्याबरोबरच बारामती येथील नामांकित महाविद्यालय मध्ये अल्पवयीन मुलाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. या हत्येच्या प्रकरणानंतर पालक व विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झालेले असून घटनेने शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे . तसेच इंदापूर तालुक्यातही गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे.
या घटना घडल्याचे समोर आल्यानंतर वंचित बहुजन युवा आघाडी पुणे जिल्हा महासचिव प्रतीक चव्हाण यांनी बारामतीचे उपविभागीय दंडाधिकारी श्री वैभव नावडकर यांना शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेतीच्या दृष्टिकोनातून बारामती उपविभागीय कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये सुरक्षा समिती स्थापन करण्यात यावी याबाबत निवेदन दिले आहे यामध्ये नमूद केले नुसार स्थापन करण्यात येणाऱ्या सुरक्षा समितीमध्ये स्थानिक पत्रकार व पोलीस कर्मचारी यांचा समावेश असावा अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे ही समिती विद्यार्थी पालकांमधून निवडण्यात यावी अशी देखील त्यात मागणी करण्यात आली आहे.
शासन निर्णय असता देखील अनेक शाळांमध्ये तक्रारपेटी व सीसीटीव्ही कॅमेरे बसवले नसल्याचे देखील त्यांनी दंडाधिकारी यांना निवेदन स्पष्ट केले आहे. शासनाचे आदेश असून देखील अद्यापही अनेक विद्यालयांमध्ये व शाळांमध्ये अद्यापही कोणत्याही प्रकारची सुरक्षा समिती घटित केली नसल्याचे देखील यामध्ये नमूद केले आहे व सर्व बाबींवर त्वरित कडक अंमलबजावणी होणे महत्त्वाचे आहे ही विनंती केली आहे.
चव्हाण यांच्या निवेदनशी तातडी दखल घेत उपविभागीय दंडाधिकारी यांनी हे निवेदन संबंधित विभागाकडे कारवाईसाठी हस्तांतरित केले आहे. या निवेदनावर तात्काळ करावे करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आले आहेत.
मा. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या बारामती मध्येच अशा प्रकारच्या घटना वाढत चाललेल्या असून त्याचा समाजावरती विपरीत परिणाम होत चालला आहे व परगावहून आलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये दहशतीचे वातावरण तयार झालेले दिसत आहे त्याचप्रमाणे पुण्यानंतर बारामतीला विद्येचे माहेरघर समजले जात असले तरी आपला पाल्य बारामतीत शिक्षणासाठी ठेवावा की नाहीबारामती! विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सुरक्षिते करता शाळा व महाविद्यालयांमध्ये सुरक्षा समिती स्थापन कराव्यात प्रतिक चव्हाण यांची मागणी. याबाबत अनेक पालकांच्या मनात शंका उत्पन्न होऊ लागल्या आहेत. शिस्तप्रिय असणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीतच अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने प्रशासनावर उपमुख्यमंत्र्यांचे पकड राहिली आहे की नाही असा प्रश्न अनेक पालक करू लागले आहेत. ह्या घटना पाहून अनेक लोकांमध्ये चर्चांना उधान आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार हे नवोदित येणाऱ्या भाई,दादा भाऊ व गुंड यांवर प्रशासनाकडून कारवाई करण्याचे आदेश देऊन अशा प्रकारांना आळा घालणार का? या सर्व प्रकरणावरती उपमुख्यमंत्री अजित पवार कोणत्या प्रकारची कारवाई करण्याचे आदेश संबंधित प्रशासनातील अधिकाऱ्यांना देणार याकडे समाजातील तसेच सर्व सामान्य घटकाची लक्ष लागून राहिले आहे.