के जे एन खिदमत फाउंडेशन पुणे महाराष्ट्र ,यांच्या वतीने कोंढवा येथे मुस्लिम समाज वधू वर मेळावा संपन्न.

Uncategorized

 शरदचंद्रजी पवार साहेब अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (श प गट )यांच्या वाढदिवसा निमित्त मुस्लिम समाज फ्री वधू वर मेळावा व दहावी बारावी गुणवंत विद्यार्थी व शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणारे व्यक्तींचा सत्कार.

खिदमत फाउंडेशन पुणे महाराष्ट्र यांच्या वतीने रविवार दिनांक 15/12/2024 सकाळी 11 वाजता
पारगे लॉन्स पारगे नगर कोंढवा खुर्द पुणे
येथे आयोजित केला होता कार्यक्रमाचे अध्यक्ष मा प्रशांत  जगताप (अध्यक्ष राष्ट्रवादी श.प.काँग्रेस मा महापौर पुणे) आणि प्रमुख उपस्थिती मा.मोहम्मद भाई पानसरे (मा.उपमहापौर पि.चि.मनपा ), नगर सेवक गफूरभाई पठाण, नगरसेविका हसीना इनामदार, मौलाना रईस हे उपस्थित होते . प्रस्तवीत भाषण हाजी मुबारकभाई शेख(सचिव) यांनी केले फाऊडेशनची स्थापना ३१/१/२०२१ रोजी झाली चार वर्ष पूर्ण झाल्यानंतर फाउंडेशनच्या कामाची माहिती दिली. प्रत्येक वर्षी मेळावा घेतला जातो छोट्या रोपट्याचं आता मोठ्या झाडांमध्ये रूपांतर झाले आहे. प्रमुख पाहुणे यांचा सत्कार के जे एन खिदमत फाऊंडेशनचे अध्यक्ष दस्तगीरभाई (बापु)मुलानी यांनी केले.
ख्वाजा गरीब नवाज खिदमत फाउंडेशन च्या वतीने नवीन इस्लामिक कॅलेंडरचे अनावरण प्रमुख अध्यक्ष माननीय प्रशांत दादा जगताप यांच्या हस्ते केले. त्याप्रसंगी त्यांच्यासोबत खितमत फाउंडेशनचे उपाध्यक्ष हाजी गफूर भाई पानसरे त्याचप्रमाणे कोंढवा शाखेचे अध्यक्ष हाजी नासिरभाई इनामदार, शकीलभाई पानसरे, मुसाभाई काजी, हनीफ भाई पठाण, बाबूलालभाई शेख, युसूफभाई सय्यद,शकूरभाई शेख, अन्वरभाई पानसरे, हाजी बाबाभाई इनामदार परिंचे ,मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्ष प्रशांत दादा जगताप यांनी फाउंडेशनचे माहिती घेऊन खूप स्तुती केली व त्यांच्या कामाच्या पुढील वाटचालीला हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे प्रमुख उपस्थित राजेंद्र भिताडे साहेब यांचे होते.
फाउंडेशनच्या वतीने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला यामध्ये प्रामुख्याने राजस हुसेन मुलानी , अजिजभाई शेख, साहिलभाई शेख, पृथ्वीराज पांडुळे गुन्हे अन्वेषण शाखा कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून यांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे वसीम राज मोहम्मद इनामदार येरवडा सेंट्रल जेल मुख्य जेलर यांचा सत्कार करण्यात आला.
युनूसभाई शेख
निलोफर गफूर शेख आदर्श नर्सिंग प्राविण्य,
फरान जमीर शेख इंटरनॅशनल आर्ट कल्चरल,
अदलान सोहेल कडेकर अबॅकस उत्कृष्ट खेळाडू ,
नाज रशीदभाई शेख आयटी इंजिनियर एम एस ऑस्ट्रेलिया गव्हर्मेंट शिष्यवृत्ती निवड, जुबेरभाई चाऊस,आसिया आपा अन्सारी, मुस्तफा अब्बास भाई सय्यद, शब्बीर भाई मुल्ला, इकबाल भाई मुल्ला, ताजुद्दीन भाई इनामदार बाबूलाल भाई शेख, कुरेशी शेख सुलतान सलाउद्दीन शहाबुद्दीन आदर्श उर्दू शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला.
विशेष सहकार्य हाजी फिरोज भाई सय्यद, एडवोकेट साहिर बागवान, मजहर पानसरे मुबीन पानसरे, इमरान इनामदार, मुजम्मिल पानसरे यांचे लाभले.
कोंढवा खिदमत फाउंडेशनच्या सर्व सभासदांनी चांगल्या पद्धतीने नियोजन करून येणाऱ्या सर्व बंधू भगिनींचे साधारणता दोन हजार लोकांचे जेवणाचे नियोजन व बाराशे मुला मुलींचे नोंदणीचे विवाह काम चांगल्या पद्धतीने केले.
पिंपरी शाखा, हडपसर शाखा, कोंढवा शाखा सासवड शाखा, फाउंडेशनच्या या सर्व शाखांच्या सभासदांनी जे सहकार्य केले त्याबद्दल कोंढवा शाखाध्यक्ष हाजी नासिरभाई इनामदार यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले आणि अशीच सहकार्याचे अपेक्षा केली.