प्रतिनिधी
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यात कारखान्याच्या केनयार्ड परिसरात ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडी, ट्रक, ट्रॅक्टर, हार्वेस्टर या वाहनांना रिफ्लेक्टर व परावर्तीत पडदे कारखान्याच्या वतीने वाटप करण्याचा कार्यक्रम मंगळवार दि. १७/१२/२०२४ रोजी बारामती उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटर वाहन निरीक्षक, श्री. बजरंग कोरवले, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक, श्रीमती प्रियांका सस्ते, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक, श्रीमती हेमलता तावरे, कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री. बाळासाहेब कामथे व उपस्थित संचालकांच्या हस्ते पार पडला.
यावेळी बोलताना बारामती उपप्रादेशिक परविहन कार्यालयाचे निरीक्षक श्री. बजरंग कोरवले यांनी उपस्थित वाहन चालक व मालक यांना कर्कश व मोठ्या आवाजात ट्रॅक्टरवर गाणी लावून ऊस वाहतूक करु नये तसेच आपल्या वाहनांना जे रिफ्लेक्टर देणेत आलेले आहेत ते लावणे बंधनकारक असल्याचे सांगितले. त्यासोबत मद्यपान करुन वाहने चालवू नयेत व वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे देखिल सांगितले. सदरील कार्यक्रम उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. सुरेंद्र निकम यांच्या मार्गदर्शनानुसार घेणेत आला.
यावेळी कारखान्याचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक श्री. राजवर्धन शिंदे, संचालक श्री. अभिजीत काकडे, श्री. लक्ष्मण गोफणे, श्री. किसन तांबे, श्री. रणजीत मोरे, श्री. संग्राम सोरटे, श्री. जितेंद्र निगडे, श्री. तुषार माहुरकर, कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी श्री. बापुराव गायकवाड आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेतकी अधिकारी श्री. सतिश काकडे यांनी केले तर आभार केनयार्ड सुपरवायझर श्री. योगेश पाटील यांनी मानले.