संपादक मधुकर बनसोडे.
राज्यात दराच्या बाबतीत नेहमीच दराची कोंडी फोडणारा सोमेश्वर सहकारी साखर कारखाना अजूनही पहिला हप्ता किती हे जाहीर करत नसल्यामुळे सोमेश्वर चा ऊस उत्पादक शेतकरी पहिल्या हप्त्याच्या अजूनही प्रतीक्षेतच आहे.
नियमाप्रमाणे ऊस तुटून गेल्यानंतर पंधरा दिवसांमध्ये उसाचे पेमेंट करणे बंधनकारक असताना? देखील अद्यापही सोमेश्वर कडून पहिला हप्ता जाहीर न केल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे
शेतकरी कृती समिती व शरदचंद्र पवार गट यांनी 3300 रुपये पहिल्या हप्त्याची मागणी सोमेश्वर च्या कारभाऱ्यांकडे केली आहे.
मात्र सध्या बाजारामध्ये साखरेचे दर पडल्यामुळे यावर्षी 2500 ते 2700 रुपये पहिला हप्ता मिळेल अशी चर्चा काही संचालक काम मधूनच होत आहे? त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोमेश्वरला फक्त साखर उद्योग नसून इतरही बायप्रॉडक्ट असल्यामुळे सोमेश्वर कडून 3300 रुपये पहिला हप्ता मिळावा अशी सभासद चर्चा करीत आहेत.
3300 रुपये पहिला हप्ता न दिल्यास शेतकरी कृती समिती व शरदचंद्र पवार गटाच्या काही कार्यकर्त्यांकडून काटा बंद आंदोलन करणार असल्याची बोलले जात आहे शेतकऱ्यांवरती आंदोलनाची वेळ येण्याअगोदरच सोमेश्वर ने त्वरित पहिल्या हप्त्याची रक्कम जाहीर करावी अशी मागणी शेतकरी वर्गामधून होत आहे.
संचालक मंडळातील काही संचालक 3000 रुपये पहिला हप्ता देण्याकरिता आग्रही भूमिका मांडत असल्याचे देखील सूत्रांकडून समजत आहे.