आयुष्यातला अविस्मरणीय क्षण प्रत्येकाला तोच खास आणि लक्षात राहण्यासारखा बनवायचा असतो असाच सोहळा गुरुवार दिनांक 26 रोजी निंबुत येथे समता लॉन्स मंगल कार्यालयाच्या भव्य प्रांगणात साजरा झाला निंबुत गावचे मा. उप सरपंच उदयसिंह नारायणराव काकडे देशमुख यांची कन्या चि. सौ. कां. पूजा व पणदरे ता. बारामती येथील सामाजिक कार्यकर्ते व प्रगतशील बागायतदार संजय शहाजीराव जगताप यांचे चि. अभिलाष यांचा शाही लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात संध्याकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी या गोरख शुभमुहूर्तावर संपन्न झाला वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी जमलेल्या वराडी पै पाहुणे मंडळींना खास मेजवानची व्यवस्था करण्यात आली होती यावेळी या शाही विवाह सोहळ्यासाठी राजेंद्र पवार सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप माळेगाव सहकार साखर कारखान्याचे चेअरमन केशव जगताप बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राजवर्धन दादा शिंदे पुणे जिल्हा शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे सोमेश्वर कारखान्याचे माझी चेअरमन शहाजी काकडे पुणे जिल्हा परिषद आरोग्य बांधकाम सभापती प्रमोद काकडे यावेळी अनेक कारखान्यांचे चेअरमन जिल्हा परिषद सदस्य दूध संघाचे चेअरमन खरेदी विक्री संघाचे चेअरमन अशा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा शाही लग्न सोहळा मोठ्या धुमधडाक्यात संपन्न झाला.
या विशेष शाही विवाह सोहळ्यासाठी पुणे जिल्ह्यातील दिग्गज राजकीय नेते मंडळींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती. जवळपास या शाही विवाह सोहळ्याची दोन महिन्यापासून नियोजन सुरू असल्याचे संभाजीराव काकडे यांनी सांगितले.
यावेळी आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचा जेवणाचा बेत अतिशय सुंदर पद्धतीने शिवाजीराव काकडे यांनी नियोजित केला होता.
मुलगी सासरी जाताना उदयसिंह काकडे यांचे पाणवलेले डोळे पाहून काकडे कुटुंबातील अनेक मंडळी भाऊक झालेली पाहायला मिळाले.