बारामती राष्ट्रवादी दिनदर्शिका -२०२५ चे प्रकाशन

माझा जिल्हा

प्रतिनिधी,

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार साहेब यांचे शुभहस्ते बारामती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिनदर्शिका (कॅलेंडर)चे प्रकाशन करण्यात आले.

       राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष श्री.राजवर्धन शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक श्री.संभाजी होळकर, बारामती सह.बँकेचे चेअरमन श्री.सचिन सातव, रा.काँ.बा.ता.कार्याध्यक्ष श्री.धनवान वदक, बारामती तालुका दूध संघाचे चेअरमन श्री.पोपटराव गावडे, रा.काँ.युवक शहराध्यक्ष श्री.अविनाश बांदल, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन श्री.विक्रम भोसले, बा.ता.रा.काँ.सरचिटणीस मा.प्राचार्य बाळासाहेब आगवणे सर, श्री.बाबुरावआण्णा चव्हाण,सौ.सोनाली जायपत्रे, व्हा.चेअरमन ख.वि.संघ,श्री.शिवाजीराव टेंगले, लक्ष्मण जगताप, रमेश देवकाते, निलेश लोणकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

   मा.ना.अजितदादा पवारसो। यांनी या दिनदर्शिकेची निर्मिती, उत्कृष्ट कागद, उत्तम मांडणी, सण, उत्सव, यात्रा,वर्धापनदिन,वाढदिवस, जयंती,धार्मिक कार्यक्रमासह सर्वच अत्यंत उपयुक्त माहिती या दिनदर्शिकेमध्ये असल्यामुळे दिनदर्शिकेचे कौतुक केले.

    या कॅलेंडरचे निर्माते श्री.संभाजीनाना होळकर यांनी सांगितले की, दरवर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याच्या वतीने ५१,००० कॅलेंडरचे मोफत वाटप करण्यात येत असून लोकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या दिनदर्शिकेसाठी मदत करणाऱ्यांचे देखील त्यांनी आभार मानले.