सोमेश्वर चा पहिला हप्ता 2800 च. सूत्रांची माहिती  शेतकरी कृती समितीच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष.

Uncategorized

प्रतिनिधी.

राज्यात नेहमीच ऊस दराबाबत सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची घोडदौड असते मात्र यावर्षी सोमेश्वर कडून पहिल्या उचलीपोटी 2800 रुपये मिळणार असल्याचे सूत्रांकडून समजले.
मात्र राज्यात अनेक कारखाने तीन हजारापासून ते 3200 पर्यंत पहिली उचल देत असल्यामुळे सोमेश्वर कारखान्याने देखील पहिल्या उचलीपोटी 3300 ची मागणी कारखान्याच्या संचालक मंडळाकडे शेतकरी कृती समितीने केली होती. जर 3300 उचल नाही मिळाली तर शेतकरी कृती समितीच्या वतीने काटाबंद आंदोलन होणार असल्याची देखील चर्चा मोठ्या प्रमाणात रंगू लागल्या होत्या. सोमेश्वर ने 2800 रुपये पहिली उचल जाहीर केल्यामुळे शेतकरी कृती समिती काय भूमिका घेणार याकडे सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.