ज्योतिर्लिंग इंग्लिश मीडियम स्कुल आणि कॅपिटल किड्स नीरा वार्षिक स्नेह संमेलन 2024 -2025 संपन्न 

माझा जिल्हा

प्रतिनिधी

निरा दिनांक ११जानेवारी2025 रोजी लक्ष्मी नारायण हॉल ,निरा येथे ज्योतिर्लिंग इंग्लिश मेडिअम स्कुल आणि कॅपिटल किड्स निरा यांचे वार्षिक स्नेह संमेलन 2024-2025 मोठ्या उत्साहात पार पडले.या वेळी प्रमुख उपस्थिती मा श्री डॉ मचिंद्रनाथ बापूजी मेरगळ व श्री सुनील मेरगळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

तसेच निरेच्या सरपंच सौ तेजश्री काकडे,उपसरपंच श्री राजेश भाऊ काकडे ,निरा पोलीस स्टेशन चे ASI श्री रविराज कोकरे,सौ आशा मेरगळ, श्री अनिल मेरगळ,सौ दिपाली मेरगळ,सौ संगीता रांगणे, सौ पूजा मेरगळ यांनी उपस्थिती दर्शविली.

या वार्षिक स्नेह समेलना मध्ये विद्यार्थ्यांना शिव चरित्र व शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा अगदी हुबेहूब दाखवून विद्यार्थ्यांनी आपल्या कलेचे कौतुकास्पद प्रदर्शन केले.

या कार्यक्रमासाठी विशेष योगदान श्री हर्षद भालेराव,आकाश शिंदे,त्याच बरोबर ज्योतिर्लिंग स्कुलच्या शिक्षिका अनिता कदम, सौ रुपाली फरांदे, सौ मोहिनी शिंदे,विद्या थोपटे आणि सर्व शिक्षक वर्ग यांचे विशेष योगदान मिळाले.

या कार्यक्रमाच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो.तसेच शिव चरित्र या विषयाच्या माध्यमातून मुलांना शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्राची माहिती मिळते.