मुरूम येथे सोमेश्वर विज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबीर उत्साहात साजरे

Uncategorized

प्रतिनिधी.

सोमेश्वर विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन मौजे मुरूम ता बारामती येथे बुधवार दि २२ जानेवारी २०२५ ते मंगळवार २८ जानेवारी २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आले होते . या हिवाळी शिबिराचे उद्घाटन हे बुधवार दि २२जानेवारी२०२५ रोजी श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक प्रतिनिधी श्री आनंदकुमार होळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाले . यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना राष्ट्रीय सेवा योजनेची मूल्ये आपल्या जीवनामध्ये जोपासा असा संदेश दिला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुरूम गावचे सरपंच संजयकुमार शिंगटे हे उपस्थित होते या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संपतराव सूर्यवंशी , उपप्राचार्य धनंजय बनसोडे, माऊली कदम – चेअरमन अजयश्री पतसंस्था, बापुराव बारवकर- व्हा. चेअरमन अजयश्री पतसंस्था, प्रकाश जगताप, प्रशिल जगताप , शिवानी सोनवणे, डॉ अमोल जगताप, विशाल कोरडे, प्रा रोहित घाडगे, ग्रामसेवक बांधार साहेब, प्रा. अजित जगताप , संदीप जगदाळे इत्यादी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा राजेश निकाळजे यांनी केली सूत्रसंचालन प्रा माधुरी भांडवलकर व आभार प्रिया राऊत यांनी केली मानले.
शिबिरादरम्यान एकूण ५० स्वयंसेवकांनी श्रमदानातून मुरूम या गावातील सर्व सार्वजनिक जागा, रस्ते, मंदिरे, शाळा, स्मशानभूमी, जेष्ठ नागरिक सभागृह या ठिकाणची स्वच्छता केली तसेच न्यू इंग्लिश स्कूल भागशाळा मुरूम व जि प प्राथमिक शाळा कदम वस्ती येथे वृक्षारोपण व पूर्वी लावलेल्या वृक्षांना आळे व पाणी घालून निगा राखली. तसेच शिबिर कालावधीत विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास व्हावा म्हणून व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये प्रा संभाजी गायकवाड , सौ. समीक्षा संध्या मिलिंद , प्रा विलास कर्डिले (जिल्हा समन्वयक रा से यो), अझहर नदाफ , प्रा सचिन तावरे, प्रा अनंथा उदमले, विभागीय समन्वयक अच्युत शिंदे यांनी अनुक्रमे माझे वाचन, ताण-तणाव व्यवस्थापन , युवा फॉर माय भारत , करिअरच्या नव्या वाटा, भारत माझा देश आहे, कथाकथन, राष्ट्रीय सेवा योजना व युवक या विषयावर मार्गदर्शन केले तसेच सोमनाथ कदम यांनी पथनाट्य प्रशिक्षण कार्यशाळा या विषयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सायंकाळच्या सत्रात गावकरी व स्वयंसेवकासाठी काव्य संमेलन, प्रा अनंथा उदमले व प्रा पुनम उदमले यांचे अभंगवाणी , स्वयंसेवकांचा सांस्कृतिक कार्यक्रम “जल्लोष” , आयोजित करण्यात आला होता तसेच श्री प्रशांत कोरडे फार्म येथे शिवार फेरी व राजेश निकाळजे यांचे पक्षी निरीक्षण असे माहितीपूर्ण उपक्रम आयोजिले,
स्वयंसेवकांनी जि प प्राथमीक शाळा कदम वस्ती व सार्वजनिक ठिकाणी “मोडून काढू ” या महिला सबलीकरण विषयावर पथनाट्यातून जनजागृती केली. शिबिरार्थींना सुसज्ज निवासस्थानासाठी श्री राजवर्धनदादा शिंदे , अध्यक्ष बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व संचालक श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ यांनी त्यांचे अजय श्री मल्टीपर्पज हॉल येथे जागा उपलब्ध करून दिली. त्याचबरोबर श्री पुरुषोत्तमदादा जगताप , चेअरमन श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, सरपंच संजय कुमार शिंदे , श्री कौस्तुभ चव्हाण – संचालक बारामती दूध संघ यांनी स्वयंसेवकांना स्नेहभोजन दिले. तसेच जि प प्राथमीक शाळा कदम वस्ती व प्रशांत कोरडे फार्म येथे भेटीदरम्यान अल्पोपहार देण्यात आला.
शिबीर समारोप समारंभ मंगळवार दिनांक २८ जानेवारी २०२५ रोजी संपन्न झाला. यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून श्री राजवर्धन दादा शिंदे व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संभाजी नाना होळकर – संचालक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हे उपस्थित होते याप्रसंगी त्यांनी स्वयंसेवकांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. यावेळेस महाविद्यालयाचे उपप्राचार्य धनंजय बनसोडे, सरपंच संजय कुमार शिंगटे , विशाल कोरडे, अजित जगताप, प्रा. जयश्री भोसले , प्रा राजश्री शेळके, प्रा गौरी खराडे, विराज कदम, संदीप जगदाळे , कौस्तुभ चव्हाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळेस स्वयंसेवकांनी आपली मनोगत व्यक्त करून शिबिरातील अनुभव व्यक्त केला प्रस्ताविक प्रा राजेश निकाळजे यांनी केले व आभार धनंजय बनसोडे यांनी मानले.
शिबिर यशस्वीपणे पार पडण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री पुरुषोत्तमदादा जगताप , उपाध्यक्ष बाळासाहेब कामथे, संचालक प्रतिनिधी श्री अनंत कुमार होळकर , सचिव भारत खोमणे, व सर्व संचालक यांनी शुभेच्छा दिल्या. प्राचार्य संपतराव सूर्यवंशी, उपप्राचार्य धनंजय बनसोडे सर्व प्राध्यापक , प्राध्यापक कर्मचारी, ग्रामपंचायत मुरूम सरपंच व सदस्य यांचे सहकार्य लाभले . रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा राजेश निकाळजे यांच्या उत्कृष्ट नियोजन व मार्गदर्शनाखाली सर्व स्वयंसेवकांनी हे शिबिर यशस्वीपणे पार पडण्यासाठी परिश्रम घेतले.