बारामती ! रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल वडगाव निंबाळकर मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.

Uncategorized

प्रतिनिधी.

बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये दिनांक १५ फेब्रुवारी रोजी वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम पार पडला . यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे पोलिस उपनिरीक्षक दिलीप सुतार , वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत सरपंच सुनील ढोले , सोमेश्वर कारखाना संचालक सुनील भगत यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले . यावेळी आलेल्या मान्यवरांचे शाल व झाड देऊन स्वागत करण्यात आले .

रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये पार पडलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये स्कूल च्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी स्कूलच्या वतीने विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला . या कार्यक्रमामध्ये लहान चिमुकल्यांनी आपली कला सादर केली कार्यक्रमाला आलेले पालक, ग्रामस्थ यांनी या चिमुकल्यांच्या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला . कार्यक्रमाचे आयोजन रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल च्या अध्यक्ष , चेअरमन व शिक्षक , शिक्षिका यांनी चांगल्या रित्या केले हा कार्यक्रम पार पाडला आलेल्या पालक , ग्रामस्थ व मान्यवरांचे वतीने चिमुकल्यांचे व प्रशालेचे कौतुक करण्यात आले.

यावेळी रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल चे अध्यक्ष कांचन काटे , चेअरमन माधव काटे , एस टी कामगार संघटना बारामती तालुका अध्यक्ष श्रीनाथ शेलार , पळशी सरपंच माणिक काळे , अलका भंडलकर , नानासाहेब मदने,
पत्रकार सुनील जाधव ,पत्रकार अमोल गायकवाड , प्रेमलता रांगोळे, जितेंद्र पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन दीपाली चव्हाण यांनी केले व आभार कांचन काटे यांनी मानले .