बारामती ! होळ येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये चोरी करण्याचा प्रयत्न 

Uncategorized

प्रतिनिधी –

बारामती तालुक्यातील होळ येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला मात्र चोरट्यांना यामध्ये अपयश मिळाले .
मिळालेल्या माहितीनुसार ..
होळ येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये रात्री १२ ते सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही घटना झाल्याचे सांगण्यात येत आहे . यामध्ये बँकेच्या पाठीमागील खिडकी तोडून आतमध्ये प्रवेश केल्याचे प्राथमिकदर्शनी पोलिस प्रशासनाच्या निदर्शनास आले . चोरीच्या वेळी cctv कॅमेऱ्याचे छेडछाड करण्यात आली असून यामध्ये बँकेत लॉकर तोडण्याचा प्रयत्न केला आहे . यामध्ये त्या चोरट्यांना बँकेमधून रोखड नेण्यात अपयश मिळाले. सकाळी बँकेचे कर्मचारी बँक उघडण्यासाठी आले असता त्यांना ही घटना समजताच त्यांनी बँक मॅनेजर व पोलिस प्रशासनासी संपर्क साधला . यावेळी पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झाली . पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पोलीस सहाय्यक निरीक्षक सचिन काळे करीत आहे .