मुख्य मजकुरावर जा
Monday, 21 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 07 August 2026 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

बारामती! वडगाव निंबाळकर पोलिसांत दोघांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल; मोराळवाडी येथील घटना.

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
August 7, 2026 1 मिनिट वाचन 8,573 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी – फिरोज भालदार

जातीवाचक शिवीगाळ करून सार्वजनिक ठिकाणी अपमानित करणे तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. ५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास मोराळवाडी (ता. बारामती) येथील जिल्हा परिषद शाळे समोर घडली.

मिळालेल्या माहितीनुसार दि. ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात आरोपींनी फिर्यादी यांना जातीवाचक शिवीगाळ करत सार्वजनिक ठिकाणी अपमानित केले. तसेच हातात दगड घेऊन दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली.

मोराळवाडी येथील फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी निलेश हनुमंत मासाळ आणि राहुल हनुमंत मासाळ दोघे रा. मोराळवाडी, ता. बारामती, जि. पुणे यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम कलम ३(१)(r), ३(१)(s), ६ सह भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३५२, ३५१(२), २९६ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी करत आहेत.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख