• Home
  • ताज्या बातम्या
  • सीजेपीच्या आंदोलनापुढे सरकार झुकले; अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

सीजेपीच्या आंदोलनापुढे सरकार झुकले; अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

प्रतिनिधी.
नवी दिल्ली, २५ जुलै : देशभरात परीक्षा गैरव्यवहार, प्रश्नपत्रिका फुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील कथित अनियमिततेच्या विरोधात सुरू असलेल्या सीजेपीच्या (CJP) आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या निर्णयामुळे आंदोलक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून आंदोलनाला महत्त्वाचे यश मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून विविध राज्यांमध्ये विद्यार्थी आणि युवकांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडले होते. शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता, प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलकांकडून सातत्याने केली जात होती.
राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन तसेच परिस्थितीचा गैरफायदा कोणीही घेऊ नये, या उद्देशाने आपण पदाचा राजीनामा दिल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी हा निर्णय “विद्यार्थी शक्तीचा विजय” असल्याचे म्हणत जल्लोष केला आहे. विरोधी पक्षांनीही या घडामोडीवर प्रतिक्रिया देत शिक्षण व्यवस्थेत व्यापक सुधारणा करण्याची मागणी पुन्हा एकदा केली आहे.

Releated Posts

बारामतीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सन्मान.

प्रतिनिधी. MHT-CET २०२६ (PCM गट) परीक्षेत राज्यातील अवघ्या १२ विद्यार्थ्यांमध्ये २ विद्यार्थी मोशन अकॅडमी बारामतीचे बारामतीतील २ विद्यार्थ्यांचे…

ByBymnewsmarathi Jul 24, 2026

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

प्रतिनिधी. जिल्ह्यात ग्रामीण भागातील ४ हजार ३९५ अंगणवाड्यातील लाभार्थ्यांना लाभ पुणे, दि.२१: महिला व बालविकास विभागाने अंगणवाडीतील घरपोच…

ByBymnewsmarathi Jul 21, 2026

खोटा गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवून १२ हजारांची खंडणी उकळली; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

बारामती,  (प्रतिनिधी): वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खोटा गुन्हा दाखल करून अटक होईल अशी भीती दाखवत एका व्यक्तीकडून…

ByBymnewsmarathi Jul 21, 2026

श्री. बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालय निंबुत येथे अभिरूप आषाढी वारी उत्साहात साजरी..

प्रतिनिधी निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयात शनिवार दि.१८/०७/२०२६ रोजी सकाळी ८•०० वाजता आषाढी वारी निमित्त अभिरूप वारीचे…

ByBymnewsmarathi Jul 19, 2026