• Home
  • क्राईम
  • दीड वर्षांचा असताना वडिलांची हत्या; २३ वर्षांनंतर मुलाने घेतला सूड, मुख्य आरोपीचा २८ वार करून खून
Image

दीड वर्षांचा असताना वडिलांची हत्या; २३ वर्षांनंतर मुलाने घेतला सूड, मुख्य आरोपीचा २८ वार करून खून

प्रतिनिधी

पुण्यातील जुन्या कात्रज बोगद्याजवळ ११ जुलै रोजी घडलेल्या खून प्रकरणाने राज्यभर खळबळ उडाली आहे. तब्बल २३ वर्षांपूर्वी आपल्या वडिलांची हत्या झाल्याचा राग मनात बाळगून एका २४ वर्षीय तरुणाने मुख्य आरोपीचा निर्घृण खून केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी मंथन वैद्य (वय २४) याच्यासह चार जणांना अटक करण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २००३ मध्ये दिनेश वैद्य यांची जुन्या वैमनस्यातून हत्या झाली होती. त्या वेळी त्यांचा मुलगा मंथन अवघा दीड वर्षांचा होता. या हत्येतील मुख्य आरोपी संजय बाबूराव कडू-देशमुख याच्यावर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला संजय यावर्षी एप्रिलमध्ये जामिनावर बाहेर आला. ही माहिती मिळताच मंथनने सूड उगवण्याचा निर्णय घेतल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्याने सौरभ परदेशी, मिजान शेख आणि संदीप कोरी या तिघांसह संजयच्या हालचालींवर सुमारे तीन महिने पाळत ठेवली. जुलैच्या पहिल्या आठवड्यात शिवनगर न्यायालय परिसरात हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.

अखेर जुन्या कात्रज बोगद्याजवळील शिंदेवाडी परिसरात संजय देशमुख याला अडवून धारदार शस्त्रांनी तब्बल २८ वार करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या संजयचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

या घटनेचा तपास राजगड पोलीस आणि पुणे ग्रामीण गुन्हे शाखेने तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तपासाच्या आधारे वेगाने केला. त्यानंतर मंथन वैद्यसह चारही आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

या घटनेमुळे जुन्या वैमनस्यातून उफाळून आलेल्या सूडाच्या भावनेचे गंभीर परिणाम पुन्हा एकदा समोर आले असून, पुढील तपास राजगड पोलीस करत आहेत.

Releated Posts

3 मुलांना स्कॉर्पिओवरून बसवून काढली धिंड; चप्पलेनं मारणाऱ्या महिलेलाच पोलिसांनी हटकलं !

प्रतिनिधी पुणे आता बिहारच्या पलीकडे गेलं असं म्हणणे हे चुकीचं ठरणार नाही. मारामारी, खून आणि कोयत्याने हल्ले करण्याच्या…

ByBymnewsmarathi Jul 21, 2026

15 वर्षांनी न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय कस्टडीत मृत्यू प्रकरणात 9 पोलिसांना दिली जन्मठेप शिक्षा.

प्रतिनिधी पोलीस कोठडीत संशयिताचा मृत्यू झाल्याप्रकरणी वाशिमच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने 15 वर्षांनंतर ऐतिहासिक निर्णय देत रिसोड…

ByBymnewsmarathi Jul 3, 2026

अवैध हातभट्टी बंद… मात्र परवानाधारक दारूच्या अवैध विक्रीला उधाण?

प्रतिनिधी एक्साईज विभाग आणि पोलिसांच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष हडपसर परिसरात अवैध दारूच्या सेवनामुळे झालेल्या मृत्यूच्या घटनेनंतर राज्यभरात पोलिस…

ByBymnewsmarathi Jul 3, 2026

मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीसह आश्रय देणाऱ्या इसमाला गुन्हे शाखा युनिट-५ कडून अटक!

प्रतिनिधी: वानवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्का (MCOCA) गुन्ह्यात गेल्या १ वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला आणि त्याला आश्रय…

ByBymnewsmarathi Jul 2, 2026