• Home
  • माझा जिल्हा
  • सोलापुरात संत गजानन महाराज आणि सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज यांच्या पालखी भेटीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न
Image

सोलापुरात संत गजानन महाराज आणि सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज यांच्या पालखी भेटीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

प्रतिनिधी

सोलापुरात संत गजानन महाराज आणि सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज यांच्या पालखी भेटीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. सम्राट चौकातील सद्गुरू प्रभाकर महाराज मंदिरात रंगलेल्या संतभेटीच्या सोहळ्याला हजारो वारकऱयांसह भाविक उपस्थित होते.

गजानन महाराजांची पालखी दोन दिवस सोलापूर मुक्कामी असून, तीर्थक्षेत्र सोलापूर हे विठुनामाच्या गजराने दुमदुमले आहे.

शेगावच्या गजानन महाराजांच्या पालखीने 500 कि.मी.चा प्रवास करत शुक्रवारी सोलापूर जिह्यात आगमन केले होते. आज सोलापूर शहरात भक्तिमय वातावरणात पाणी गिरणीजवळ पालखीचे आगमन झाले. महापौर विनायक कोंडय़ाल, धनश्री कोंडय़ाल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, आयुक्त सचिन ओम्बासे, पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्यासह पदाधिकारी व अधिकाऱयांनी पालखीचे स्वागत केले. त्यानंतर पालखी मार्गावरून गजानन महाराजांच्या पालखीचे सम्राट चौकातील सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात आगमन झाले.

परंपरेप्रमाणे ‘गण गण गणात बोते’चा जयघोष टाळ-मृदुंगाच्या गजरात मंदिरामध्ये गजानन महाराजांची पालखी आणि सदगुरू प्रभाकर स्वामी महाराज पालखींचा अनुपम भेटीचा सोहळा संपन्न झाला. यावेळी हजारो भाविकांनी केलेल्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले होते. भेटी सोहळ्यानंतर आरती करण्यात आली व वारकरी व भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या पालखी सोहळ्यात 700 वारकरी गेल्या 22 दिवसांपासून पायी चालत आहेत.

सायंकाळी कुचन प्रशालेत पालखीचा मुक्काम होता, तर रविवारी सातरस्ता परिसरातील उपलप मंगल कार्यालयात मुक्काम राहणार असून, सोमवारी सकाळी पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. पालखी भेट सोहळय़ानिमित्त शहरात विविध ठिकाणी प्रसादाचे वाटप करण्यात आले.

Releated Posts

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या धर्मशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन.

उपसंपादक- अक्षय थोरात  मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी उभारलेली ही सुसज्ज धर्मशाळा हजारो वारकऱ्यांसाठी हक्काचा निवारा ठरेल आणि…

ByBymnewsmarathi Jul 4, 2026