प्रतिनिधी
हदगाव तालुका मरडगाव येथे मानव विकास संरक्षण समितीच्या वतीने तालुका अध्यक्ष सौ, अनिता काळे पाटील यांच्या माध्यमातून व राष्ट्रीय अध्यक्ष श्री विजयजी कुराडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महिला रोजगार मेळावा घेण्यात आला, मरडगाव व परिसरातील महिलांना गावातच रोजगार मिळाला पाहिजे या हेतूने मानव विकास संरक्षण समिती नवी दिल्ली,रजि,भारत सरकार या समितीचे हेड जनसंपर्क अधिकारी श्री बी, व्ही, शिंदे साहेब या कार्यक्रम साठी आवर्जून उपस्थित होते, त्यांनी महिलांना स्वयं रोजगार या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले,तसेच एखाद्या वस्तूचे मार्केटिंग कसे करावे या संबंधी माहिती दिली, तसेच मानव विकास संरक्षण समिती बद्दल सामाजिक कामाची माहिती दिली
हदगाव तालुका अध्यक्ष सौ, अनिता काळे पाटील यांनी प्रस्तावित केले, त्यावेळी त्यांनी सांगितले कि, मरडगावात महिलांचे दहा बचतगट स्थापन केले परंतु या महिलांना रोजगार नाही
म्हणून स्वयं रोजगार मिळाला पाहिजे महिलांच्या हाताला काम मिळाले पाहिजे, प्रत्येक महिला ही आत्मनिर्भर झाली पाहिजे,मोलमजुरीच्या कमी पैशात कुटुंब चालवणे अवघड होऊन जाते म्हणून महिलांना स्थानिक गावात रोजगार किंवा जोडधंदा मिळाला पाहिजे या हेतूने हा रोजगार मेळावा घेतला आहे गावातील महिला सरपंच यांनी दीपप्रज्वलन करुन सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन केले,
यावेळी गावातील तीनशेहून अधिक महिला मेळाव्यात सहभागी झाल्या होत्या, त्याचप्रमाणे पुरुष व युवकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती, हदगाव तालुका अध्यक्ष सौ, अनिता काळे पाटील यांची तालुका अध्यक्ष म्हणून नुकतीच नियुक्ती झालेली आहे, सामाजिक काम करणारी संस्था म्हणून मानव विकास संरक्षण समितीचा महाराष्ट्र ,गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश या भागात नावलौकिक मिळवला आहे
मुंबई, व दिल्ली येथे संस्थेचे ऑफिस आहे तेथूनच संस्थेचे सर्व कामकाज चालते, आशा सामाजिक संस्थेचे तालुका अध्यक्ष पद सौ, अनिता काळे पाटील यांना मिळाले त्याबद्दल त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष विजयजी कुराडे साहेब व महाराष्ट्रचे हेड जनसंपर्क अधिकारी श्री भाऊसाहेब शिंदे साहेब यांचे आभार व्यक्त केले, समितीच्या माध्यमातून आपण गावातील महिलांच्या समस्या व महिला सबलीकरण यावर मोठ्या प्रमाणात काम करणार आहोत असेही अनिता काळे पाटील यांनी सांगितले, नांदेड जिल्हा अध्यक्ष विजयाताई काचावार यांच्या उपस्थितीत मकरसंक्रांतीच्या निमित्ताने हळदीकुंकू मिलन हा कार्यक्रम घेण्यात आला व त्यांनीही महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले, यावेळी तालुका अध्यक्ष सौ,अनिता काळे पाटील यांनी विजयाताई काचावार यांना साडी चोळी देऊन यथोचित सत्कार केला, हा मेळावा यशस्वी करण्यासाठी ज्या महिलांनी योगदान दिले त्या सर्वांचे त्यांनी आभार मानले,