प्रतिनिधी.
साहेबराव दादा विविध कार्यकारी सोसायटीची 113 वी वार्षिक सर्वसाधारण सभा निंबुत येथील बाबा कमल सभागृहांमध्ये सकाळी 9:30 वाजता खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली.
सभेपुढील विषय वाचून सचिव योगेश काकडे यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेचे सुरुवात केली.
यावेळी सभेचे अध्यक्ष श्री सतीश राव काकडे यांनी यावेळी कर्जदार सभासदांनी वेळेत कर्ज फेड करावी
असे आवाहन केले. यावेळी संचालक संभाजी काकडे सर आपल्या सोसायटीच्या माध्यमातून विविध व्यवसाय सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले संस्थेचे चेअरमन अजित सर्जेराव काकडे यांनी आवाहन केले की सहकारी संस्था या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा आत्मा आहे आणि त्या टिकवणे ही सर्व सभासदांची जबाबदारी आहे. यावेळी अजिंठावरील सर्व विषय सभासदांनी एकमताने मंजूर केले
या सभेचे सूत्रसंचालन सचिव योगेश राव काकडे यांनी केले तर आभार राजकुमार बनसोडे यांनी मांनले