ॲड. सुप्रिया विशाल बर्गे यांना राज्यस्तरीय क्रांती ज्योती सावित्रीबाई सन्मानरत्न पुरस्कार प्रदान*

Uncategorized

प्रतिनिधी.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह गंजपेठ पुणे येथे ॲड. सुप्रिया विशाल बर्गे यांच्या कायदेविषयक जनजागृती व कौटुंबिक समुपदेशन या कार्याची दखल घेत राज्यस्तरीय क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले सन्मानरत्न पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला.या पुरस्काराचे आयोजन साऊ ज्योती फाउंडेशन व सर्च फाउंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने पुणे येथे केले होते. या पुरस्कार सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून मान्यवर उपस्थित होते.

देशाच्या प्रगतीसाठी, व राष्ट्राच्या हितासाठी सामाजिक उज्वल भवितव्यासाठी ॲड. सुप्रिया विशाल बर्गे विधी क्षेत्रात गेल्या 16 वर्षापासून सातत्यपूर्ण उत्कृष्ट सामाजिक कार्य करीत आहेत. स्त्री शिक्षण, महिला सबलीकरासाठी विविध कायदेविषयक मागदर्शन, सल्ला त्या देत असून वकिली क्षेत्रातील सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन दिग्गज मान्यवरांच्या हस्ते ॲड. सुप्रिया बर्गे यांचा सन्मान करण्यात आला.

ॲड. सुप्रिया विशाल बर्गे या जनसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. कौटुंबिक समुपदेशनाने अनेक संसार जोडण्यात त्यांना यश आले असून त्या विद्यार्थ्यांना देखील कायदेविषयक मार्गदर्शन करीत असतात. महिला सुरक्षा, महिला सबलीकरण करताना कायदेविषयक ज्ञानाचा उपयोग महिलांना रोजच्या जीवनात अत्यंत गरजेचा आहे. ॲड. सुप्रिया बर्गे यांचे कायदेविषयक जनजागृती व समुपदेशनाचे कार्य प्रेरणादायी असून काळाची नितांत गरज असल्याचे मत साऊ ज्योती फाउंडेशन च्या अध्यक्षा आम्रपाली ज्ञानोबा पारखे यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे आयोजक सचिन हळदे, राहुल भाऊ निकाळजे, सत्यदिप खडसे, भारत हळदे, दिनेश गायकवाड, पवन शेळके, यांनी ॲड. सुप्रिया बर्गे यांचे कार्य भारतीय कुटुंब संस्था टिकविण्यासाठी, घटस्पोट घेण्यापासून तरुण पिढीला परावृत्त करण्यासाठी आवश्यक असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालक ॲड. उमाकांत आदमाने यांनी ॲड. सुप्रिया बर्गे यांच्या कार्याचा आढावा घेत सुखी संसार कसा करावा याचे मार्गदर्शन वर्ग सुरू करण्याचा सल्ला दिला.

माझ्या वकिली व्यावसायातील व सामाजिक कार्यात पती ॲड. विशाल बर्गे व सासरे ॲड. विजयकुमार बर्गे यांचे सिंहाचा वाटा असून त्यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य मला सातत्याने मिळत असते. कुटुंबातूनच महिलांना स्वतः चे कर्तुत्व सिद्ध करण्याची संधी मिळाल्यास महिला नक्कीच संधीचे सोने करतील अशी प्रतिक्रीया अँड. सुप्रिया बर्गे यांनी दिली.

कार्यक्रमाचे उद्घाटन सौ. नीलिमाताई पाटील, अन्वी अनिता चेतन घाटगे, मा. बाळराजे वाळूजकर, मा. आम्रपाली घाटगे यांनी केले.

मा. ऋतुजा पाटील, मा. काव्या मुंबईकर, जन्विराजे पाटील, मा. भक्ती साधू, मा. चित्रा दीक्षित, मा. शैलेश भट्ट, मा. dr.शबनम शेख, मा. सुजाता गुरव, मा. प्रा. dr. राजू पांचाळ, मा. उत्तम शेळके, मा. ॲड. नीता शेळके, मा. dr. विद्याश्री यमचे, मा. नितीन सूर्यवंशी, मा. महेश्वरी गिरडे, मा. अनिता चेतन घाडगे, मा. प्रा. धाराशिव शिराळे, यांचे हस्ते पुरस्कार सन्मान सोहळा दिमाखात पार पडला.

याप्रसंगी ॲड. सुप्रिया विशाल बर्गे यांनी मनोगत व्यक्त करताना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या आम्ही महिला शतशः ऋणी आहोत, आज जो पुरस्कार मिळाला तो केवळ वकिली क्षेत्रातील शिक्षणामुळे, आपल्या ज्ञानाचा जनसामान्यांना अविरतपणे उपयोग ह्वावा यासाठी योग्य कायदेविषयक मार्गदर्शन, सल्ला, व कौटुंबिक समुपदेशन करण्यासाठी मी सैदव तत्पर राहिन. असे प्रतिपादन ॲड. सुप्रिया बर्गे यांनी केले. त्यांना शिक्षणासाठी मदत करणारे सर्व शिक्षक, मित्र मैत्रिणी, नातेवाईक, आई सौ नंदा काकडे व वडील श्री.ज्ञानदेव काकडे यांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले, त्यांचे माहेर निंबुत मधील सर्व ग्रामस्थांचे बंधू-भगीनी, तसेच बारामती येथील सर्व ग्रामस्थ व सासरकडील सर्वांच्या सहकार्यासाठी आभार मानले.