प्रतिनिधी
वाघळवाडी गावचे हद्दीत राम आर्ट शेजारीस बोळात भगवान रामलिंग सोनवणे रा. करंजेपुल गायकवाडवस्ती ता. बारामती जि.पुणे हा आपले कब्जात कल्याण मटका नावाची जुगाराची साधणे बाळगुन तो आपले ओळखीचे लोकांकडून पैसे घेवुन त्याबदल्यात त्यांना डुप्लीकेट पुस्तकातील मुळ चिठ्ठया देवुन कल्याण मटका नावाचा जुगार खेळत व खेळवित आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच पोलीस उपनिरीक्षक साबळे साो यांनी दोन लायक पंचांना करंजेपुल पोलीस दुरक्षेत्र येथे बोलावुन घेवुन त्यांना व आंम्हांला पोलीस स्टाफला मिळाले बातमीचा आशय कळवुन पंचांना पंच म्हणुन सोबत येण्याची विनंती केली असता पंचांनी त्यास सहमती दर्शविल्यानंतर आंम्ही पोलीस स्टाफ व पंच असे मिळाले बातमीचे ठिकाणी खाजगी वाहनाने जावुन खाजगी वाहन मिळाल्या बातमीच्या थोड्या अंतरावर रोडवर उभी करुन पायी चालत जावुन अचानक ११/३० वा.छापा घातला असता तेथे एक इसम बसलेला दिसला आंम्हा पोलसांची चाहुल लागताच तो पळुन जावु लागला असता आंम्ही पोलीस स्टाफने त्यास जागेवरच पकडले त्यास आंम्ही त्याचे नाव पत्ता विचारता त्याने आपले नाव भगवान रामलिंग सोनवणे वय ४१ वर्षे रा. करंजेपुल गायकवाडवस्ती ता. बारामती जि.पुणे असे असल्याचे सांगितले तसेच त्याचे कब्जात एक पांढरे व पिवळे रंगाचे स्लीप पुस्तक त्या पुस्तकावर NO-004270 कल्याण ता.२८/०१/२५ असे लिहलेले पुस्तकाचे आतील एकुण ५ पानावर आकडेमोड केलेली व एक पुस्तकाचे आकराचा कार्बन तुकडा तसेच एक बॉलपेन व रोख रक्कम ५५०/-रुपये असा एकुण ५५५/-रु.चा जुगाराचा माल साधनासह मिळुन आला आहे. अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक साबळे यांनी दिली.सदरचा मटका मालक अशोक सदाशिव लोंढे रा. वाघळवाडी ता. बारामती जि.पुणे यांचा असुन मी त्यांचेकडे कामास आहे असे मिळालेल्या आरोपींनी सांगितले आहे. सदरचा माल पोलीस उपनिरीक्षक साबळे सो यांनी सोबतचे पंचासमक्ष पंचनाम्याने जप्त करून ताब्यात घेतला सदरचा माल प्लॅस्टीकचे पिशवित घालुन त्यावर पोलीस उपनिरीक्षक साबळे सो व पंचांचे सहयांची कागदी सिले जागीच केली आहेत.
भगवान रामलिंग सोनवणे वय ४१ वर्षे रा. करंजेपुल गायकवाडवस्ती ता. बारामती जि.पुणे हा आपले कब्जात कल्याण मटका नावाची जुगाराची साधणे व रोल रक्कम असा ५५५/-रुपयेचा माल जवळ बाळगुन कल्याण मटका नावाचा जुगाराचा खेळ खेळत व खेळवित असताना जागेवरच मिळुन आला सदरचा मटका मालक अशोक सदाशिव लोंढे रा. वाघळवाडी ता. बारामती जि.पुणे हा आहे. म्हणुन माझी १) भगवान रामलिंग सोनवणे वय ४१ वर्षे रा.करंजेपुल गायकवाडवस्ती ता. बारामती जि.पुणे २) अशोक सदाशिव लोंढे रा. वाघळवाडी ता. बारामती जि.पुणे त्याचे विरुध्य मुंबई जुगार अॅक्ट कलम १२ (अ) प्रमाणे सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद आहे. सदर गुन्ह्याचा तपास नागटिळक सो हे करीत आहेत.