प्रतिनिधी.
करंजे गावचे सुपुत्र बंटी गायकवाड हे नेहमीच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात निष्ठावंत कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे बंटी गायकवाड एकीकडे पक्षातील अनेक दिग्गज पक्ष सोडून जात असताना एक सामान्य कार्यकर्ता जो पक्षासाठी झगडत होता आपल्या पक्षाच्या माध्यमातून सामान्य लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न करत होता त्या सामान्य कार्यकर्त्याला आज कुठेतरी न्याय मिळाल्याची भावना शिवसैनिकांमधून व्यक्त होत आहे.
बंटी गायकवाड यांची बारामती तालुका विधानसभा क्षेत्र प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल सोमेश्वर पंचक्रोशीतील नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन केले गेले व या निवडीच्या वेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय काळे, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब शिंदे,वाहतूक सेना जिल्हाप्रमुख राजेंद्र पिंगळे,तालुकाप्रमुख निलेश मदने,विधानसभा संपर्कप्रमुख अदिराज कोठाडिया, युवा सेना तालुकाप्रमुख निखिल देवकाते, महिला तालुका संघटिका सुनीताताई खोमणे माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र काळे साहेब आणि तालुक्यातील शिवसैनिक उपस्थित होते.