Donot Miss
Latest Posts
Highlight
Popular News
शरदचंद्र पवार साहेब यांच्या 82 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून नींबूत ग्रामपंचायतच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर.
प्रतिनिधी. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 82 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रामपंचायत निंबूत व साई सेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड आयसीयू यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे या शिबिरामध्ये विविध प्रकारच्या3900 रुपये पर्यंतच्या तपासण्या गरजेनुसार व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मोफत करण्यात येतील अशी माहिती गौतम शहाजीराव काकडे यांनी दिली. वरील शिबिर हे मंगळवार […]
भारतीय युवा पॅंथर कऱ्हाटी ग्रामपंचायत लढणार स्वबळावर.गौरव अहिवळे
प्रतिनिधी. : बारामती तालुक्यातील काऱ्हाटी ग्रामपंचायत निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे भारतीय युवा पँथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे यांनी आमच्या प्रतिनिधी सोबत बोलताना सांगितले.राज्य निवडणूक आयोगाने सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.दिनांक १८/१२/२०२२ रोजी मतदान आहे.उमेदवार निवडणूक जाहीर झाल्यानंतर निवडून होईपर्यंत मतदाराच्या घरी – दारी जातात. परंतु निवडणूक झाल्यानंतर निवडणुकीनंतर जनता उमेदवाराच्या दारात अशी […]
भारत आता दुर्बळ राहिलेला नाही, आम्ही शांततेवर विश्वास ठेवतो, मात्र कुणी आगळीक केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ : हरियाणा इथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन
संपादक मधुकर बनसोडे भारताकडे वक्र दृष्टीने बघणाऱ्या कुणालाही चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आपली सशस्त्र दले पूर्णपणे सुसज्ज आहेत अशा शब्दात, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राष्ट्राला आश्वस्त केले आहे. हरयाणात झज्जर इथे आज 13 नोव्हेंबर 2022 रोजी एका कार्यक्रमाला संबोधित करताना संरक्षण मंत्र्यांनी सांगितले की राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्याकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे लक्ष […]
सातारा पिंपरे बुद्रुक व पुणे जिल्ह्यातील पिंपरे खुर्द यांच्यामधील निरा नदी बंधाऱ्यावर संरक्षण कडे नसल्याने बसवण्यासाठी नागरिकांची मागणी?
प्रतिनिधी – सोपान कुचेकर पिंपरे बुद्रुक आणि पिंपरे खुर्द यांच्यामधील निरा नदीवर जो बंदरा आहे त्याला संरक्षण कठडे नसल्याने या बंधाऱ्यावरून ये जा करताना रात्री अपरात्री जीव मुठीत घेऊन भीतीदायक करावा लागतोय प्रवास. प्रवास करताना नागरिकांची खूप दमछाक होत आहे. याकडे संबंधित अधिकारी प्रशासन का लक्ष देत नाही असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. सुरुवातीला […]
2027 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेला जगात तिसऱ्या क्रमांकावर येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही – केंद्रीय मंत्री अमित शाह
संपादक मधुकर बनसोडे राज्यातील वैद्यकीय आणि तंत्रज्ञान शिक्षण तमिळ भाषेतून उपलब्ध करुन देण्याचे आवाहन, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज तामिळनाडू सरकारला केले.तामिळनाडूत इंडिया सिमेंट्सच्या अमृत महोत्सवी सोहळ्याला ते आज उपस्थित होते. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की मी तामिळनाडू सरकारला वैद्यकीय आणि तंत्रज्ञान शिक्षणात तमिळ हे शिक्षणाचे माध्यम म्हणून उपलब्ध करण्याचे आवाहन करतो. अनेक राज्य […]
पुणे आणि बँकॉक दरम्यान थेट विमानसेवेचे, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरार्दित्य सिंदिया यांच्या हस्ते उद्घाटन
प्रतिनिधी केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि पोलाद मंत्री ज्योतिरार्दित्य एम. सिंदिया यांनी आज पुणे ते बँकॉक या थेट विमान सेवेचे उद्घाटन केले. 12 नोव्हेंबर 2022 म्हणजे आजपासून पुणे-बँकॉक-पुणे दरम्यान विमान सेवा सुरु होत आहे. या मार्गावर दर मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी विमान उड्डाणे होतील. पुणे आणि बँकॉक दरम्यानच्या या हवाई संपर्कामुळे व्यापार, शिक्षण आणि […]
डीआरआयच्या अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे मुंबई विमानतळावर 35 कोटी रुपये किमतीचे हेरॉईन जप्त
प्रतिनिधी सोपान कुचेकर नैरोबीहून मुंबईला आज 11 नोव्हेंबर 2022 रोजी येणारा एक प्रवासी अंमली पदार्थांची तस्करी करत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यामुळे त्या आधारावर डीआरआय अर्थात महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांच्या एका पथकाने मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात पाळत ठेवली.संशयित प्रवाशाने ग्रीन चॅनेल पार केल्यानंतर त्याची ओळख पटल्यावर डीआरआयच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने त्याला अडवून त्याच्याकडील […]
भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय मंत्र्यांचा बारामती तालुक्यात दौऱ्यांचा सपाटा.
संपादक मधुकर बनसोडे. भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय मंत्री व राज्यमंत्री यांचा बारामती तालुक्यात दौऱ्यांचा सपाट सपाटा सुरू झाल्याचे चित्र मागील काही दिवसापासून दिसत आहे. मागील काही दिवसापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा दौरा झाला होता. त्या पाठोपाठ काल भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल यांच्या देखील दौऱ्याला सुरुवात झालेली आहे. बारामती तालुक्यातील सुरुवातीचे निंबुत […]
आधारची कागदपत्रे अद्ययावत करण्याबाबत
प्रतिनिधी गेल्या दशकात आधार क्रमांक हा भारतातील रहिवाशांच्या ओळखीचा पुरावा म्हणून उदयास आला आहे. अनेक सरकारी योजना आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांकाचा वापर केला जातो. ज्या रहिवाशांनी 10 वर्षांपूर्वी आधार क्रमांक घेतला आहे आणि ज्यांनी तेव्हापासून ते कधीच अद्ययावत केलेले नाहीत, अशा आधार क्रमांक धारकांना त्यांच्या कागदपत्रांच्या अद्ययावतीकरणासाठी प्रोत्साहित केले जाते. मात्र ही प्रक्रिया […]
गोवर रोगाच्या प्रादुर्भावाचे मूल्यांकन आणि व्यवस्थापन करण्यासाठी केंद्र सरकारकडून उच्चस्तरीय पथक मुंबईत तैनात
प्रतिनिधी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने मुंबईतील गोवरच्या वाढत्या रुग्णसंख्येचा आढावा घेण्यासाठी एक उच्चस्तरीय बहु-शाखीय पथक मुंबईत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. हे पथक राज्याच्या आरोग्य प्रशासनाला सार्वजनिक आरोग्य उपाययोजना आखण्यात तसेच आवश्यक नियंत्रण आणि प्रतिबंधात्मक उपाय कार्यान्वित करण्यात मदत करेल. मुंबईला जाणाऱ्या 3 सदस्यीय केंद्रीय पथकामध्ये राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (NCDC), नवी दिल्ली, लेडी […]
