• Home
  • ताज्या बातम्या
  • श्री. बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालय निंबुत येथे अभिरूप आषाढी वारी उत्साहात साजरी..
Image

श्री. बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालय निंबुत येथे अभिरूप आषाढी वारी उत्साहात साजरी..

प्रतिनिधी
निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयात शनिवार दि.१८/०७/२०२६ रोजी सकाळी ८•०० वाजता आषाढी वारी निमित्त अभिरूप वारीचे नियोजन करण्यात आले.
यावेळी विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी वारकरी वेशभूषा परिधान केली होती. मुलींनी डोक्यावर तुळस घेतली.वारकरी वेश परिधान करून विद्यार्थ्यांनी खांद्यावर विठ्ठल रुक्मिणी व ज्ञानोबांची पालखी घेतली. पालखीत विठ्ठल रुक्मिणी यांची मोहक मूर्ती ठेवण्यात आली होती. समोर अब्दागिरी, खांद्यावर भगवी पताका, गळ्यात टाळ मृदंगाच्या निनादात निंबुत गावात अभिरूप आषाढी वारी संपन्न झाली. यावेळी शालेय परिसर व निंबुत गाव ज्ञानोबा तुकोबारायांच्या जयघोषाने दुमदुमला. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी संविधानाबद्दल जागृती निर्माण करणारे फलक हातामध्ये घेऊन वारीमध्ये जनजागृती केली.
विठ्ठलमंदीर परिसरात आल्यानंतर शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींनी फुगडी खेळण्याचा आनंद लुटला.
विद्यालयातील या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.सतीशभैय्या काकडे दे.उपाध्यक्षा सौ.सुप्रियाताई पाटील व मा.श्री.भीमराव बनसोडे सर तसेच मानद सचिव मा.श्री.मदनराव काकडे दे.यांनी शुभेच्छा दिल्या.

Releated Posts

निंबुतमध्ये संत सोपानकाका पालखीचे उत्साहात स्वागत; लेझीमच्या तालावर संविधानाचा जागर!

​दि. १४ जुलै संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याचे आज मंगळवारी दुपारी ठीक ५:०० वाजता निंबुत गावामध्ये अत्यंत भक्तीमय…

ByBymnewsmarathi Jul 14, 2026

अपघातग्रस्त वारकऱ्यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली भेट. मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत; जखमींवर मोफत उपचार करण्याचे निर्देश.

पालखी महामार्गावरील अपघातग्रस्त वारकऱ्यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली भेट ; जखमींवर मोफत उपचार करण्याचे सूचना देऊन मृतांच्या…

ByBymnewsmarathi Jul 13, 2026

श्री संत तुकाराम महाराज व श्री संत सोपानकाका महाराज पालखी स्वागतासाठी बारामती सज्ज-नगराध्यक्ष सचिन सातव

पालखी सोहळा सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे-मुख्याधिकारी पंकज भुसे बारामती, दि. ११: श्री संत तुकाराम महाराज पालखीचे…

ByBymnewsmarathi Jul 11, 2026

बारामती! वडगाव निंबाळकर बंगला झोपडपट्टी येथे सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीच्या खोलीकरणाचे काम संत गतीने चालू? ; मात्र ग्रामपंचायत प्रशासनाचे यावरती दुर्लक्ष.

प्रतिनिधी- फिरोज भालदार वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत प्रशासनाकडून बंगला झोपडपट्टी येथील सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीच्या खोलीकरणाचे काम चालू झाले आहे…

ByBymnewsmarathi Jul 8, 2026