• Home
  • क्राईम
  • तोतया पत्रकार लूट प्रकरणात अटकेत; महिला पोलीस हवालदारासह दोघे सहआरोपी
Image

तोतया पत्रकार लूट प्रकरणात अटकेत; महिला पोलीस हवालदारासह दोघे सहआरोपी

प्रतिनिधी

नवले पूल परिसरात व्यावसायिकाची मोटार अडवून एक कोटी रुपयांची लूट प्रकरणात नऱ्हे पोलिसांनी तोतया पत्रकाराला अटक केली. या प्रकरणात ग्रामीण पोलीस दलातील राजगड पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या खेड शिवापूर पोलीस चौकीतील महिला पोलीस हवालदारासह पोलीस शिपायाला सहआरोपी करण्यात आले आहे.

व्यावसायिक मोटारीतून खेड शिवापूर पोलीस चौकीत आला. तेव्हा महिला पोलीस हवालदार आणि तोतया पत्रकार तिवारीने व्यावसायिकाच्या पिशवीतील २० लाख रुपये काढून घेतले. या प्रकाराची माहिती राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांना मिळाली. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. तिवारी याने २० लाखांची रोकड दुचाकीच्या डिक्कीत ठेवली होती. खेड शिवापूर पोलीस चौकीत सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत.

पण, तिवारी याने एका हाॅटेलसमोर दुचाकी लावून डिक्कीत पैसे ठेवल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी टिपला होता. याबाबतचा गोपनीय अहवाल पोलीस निरीक्षक जाधव यांनी पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्याकडे पाठविला. नवले पूल परिसरात ही घटना घडल्यानंतर या प्रकरणी नऱ्हे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. नऱ्हे पोलिसांकडे हे प्रकरण तपासासाठी आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

Releated Posts

दीड वर्षांचा असताना वडिलांची हत्या; २३ वर्षांनंतर मुलाने घेतला सूड, मुख्य आरोपीचा २८ वार करून खून

प्रतिनिधी पुण्यातील जुन्या कात्रज बोगद्याजवळ ११ जुलै रोजी घडलेल्या खून प्रकरणाने राज्यभर खळबळ उडाली आहे. तब्बल २३ वर्षांपूर्वी…

ByBymnewsmarathi Jul 21, 2026

3 मुलांना स्कॉर्पिओवरून बसवून काढली धिंड; चप्पलेनं मारणाऱ्या महिलेलाच पोलिसांनी हटकलं !

प्रतिनिधी पुणे आता बिहारच्या पलीकडे गेलं असं म्हणणे हे चुकीचं ठरणार नाही. मारामारी, खून आणि कोयत्याने हल्ले करण्याच्या…

ByBymnewsmarathi Jul 21, 2026

15 वर्षांनी न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय कस्टडीत मृत्यू प्रकरणात 9 पोलिसांना दिली जन्मठेप शिक्षा.

प्रतिनिधी पोलीस कोठडीत संशयिताचा मृत्यू झाल्याप्रकरणी वाशिमच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने 15 वर्षांनंतर ऐतिहासिक निर्णय देत रिसोड…

ByBymnewsmarathi Jul 3, 2026

अवैध हातभट्टी बंद… मात्र परवानाधारक दारूच्या अवैध विक्रीला उधाण?

प्रतिनिधी एक्साईज विभाग आणि पोलिसांच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष हडपसर परिसरात अवैध दारूच्या सेवनामुळे झालेल्या मृत्यूच्या घटनेनंतर राज्यभरात पोलिस…

ByBymnewsmarathi Jul 3, 2026