• Home
  • माझा जिल्हा
  • बारामती ! रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल वडगाव निंबाळकर येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.
Image

बारामती ! रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल वडगाव निंबाळकर येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

प्रतिनिधी- फिरोज भालदार

रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला . या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक विजय बबनराव साबळे हे उपस्थित होते . रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याची शौर्यगाथा सांगणारे भाषण , मर्दानी खेळ (लाठी काठी , दांडपट्टा , रनवार , पाशचक्र , भाला) तायक्वांदो , हनुमान बैठक असे विविध धाडसी , नेत्रदीपक खेळ सादर केले.

आर्मी ऑफिसर विजय साबळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पालकांना मार्गदर्शन केले . मार्गदर्शन करताना पालकांनी मुलांना मैदानी खेळ खेळण्यास प्रोत्साहन द्यावे व त्यांचा भारत देशासाठी हातभार लागावा यासाठी चांगले सैनिक तयार व्हावेत या दृष्टीने ही शाळेला शुभेच्छा दिल्या.

यावेळी या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष कांचन काटे मॅडम , उपाध्यक्ष माधव काटे , मुख्याध्यापक श्रद्धा मस्कर, दिपाली नलवडे, दिपाली चव्हाण, कांचन साळवे, स्वाती गायकवाड, प्रज्ञा ताम्हाणे, निशा चव्हाण, मोनिका मोरे, शिवाजी साळुंखे यांनी परिश्रम घेतले . कार्यक्रमाला पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Releated Posts

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या धर्मशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन.

उपसंपादक- अक्षय थोरात  मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी उभारलेली ही सुसज्ज धर्मशाळा हजारो वारकऱ्यांसाठी हक्काचा निवारा ठरेल आणि…

ByBymnewsmarathi Jul 4, 2026