• Home
  • माझा जिल्हा
  • “आम आदमी पक्षाच्या वतीने खेड तालुक्यातील काळूस येथील शेतकऱ्यांचे सुरू असलेल्या’ बेमुदत आमरण उपोषण’ आंदोलनास दिलापाठिंबा!”
Image

“आम आदमी पक्षाच्या वतीने खेड तालुक्यातील काळूस येथील शेतकऱ्यांचे सुरू असलेल्या’ बेमुदत आमरण उपोषण’ आंदोलनास दिलापाठिंबा!”

प्रतिनिधी

“काळूस ता. खेड येथील शेतकऱ्यांनी १५ ऑगस्ट२०२४ पासून शेतजमिनीवरील बेकायदेशीर पुनर्वसणाचे शिक्के काढून सातबारा कोरा करण्यासाठीसुरू केलेल्या बेमुदत’अमरण उपोषण”आंदोलनास भेट देऊन आम आदमी पक्षाचे प्रदेश युवा अध्यक्ष-श्री मयूर दौंडकर यांनी दिलेजाहीर पाठिंब्याचे पत्र!”

       खेड तालुक्यातील काळुस येथील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर चासकमान धरण पुनर्वसन अंतर्गत गेल्या ४०वर्षापासून बेकायदेशीर रित्या पुनर्वसनाची शिक्के टाकले आहेत.

      शेत जमिनीवर टाकलेले बेकायदेशीर पुनर्वसनाचे शिक्के काढून सातबारा कोरा करण्यासाठी येथील शेतकरी वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करत आहे. १५ ऑगस्ट२०२४ स्वातंत्र्य दिना पासून येथील शेतकरी आपल्या मागणीसाठी बेमुदत आमरण उपोषण आंदोलनास बसले आहेत. या आंदोलनास आंदोलन स्थळी जाऊन आम आदमी पक्षाचे प्रदेश युवा अध्यक्ष श्री. मयूर दौंडकर यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन, त्यांच्याशी त्यांच्या प्रश्नासंदर्भातचर्चा केली ,चौकशी करून विचारपूस केली. आणि त्यांच्या प्रश्न समजून घेतला. व आंदोलनकर्त्यांना आम आदमी पक्षांच्या वतीने जाहीर पाठिंबाचे पत्र दिले.

     उपोषणकर्त्यांची मागणी न्याय असून त्यांच्यावर झालेला अन्यायावर शासनाने वेळीच लक्ष देऊन दूर केला पाहिजे. अशी भूमिका श्री. मयूर दौडकर यांनी त्यांच्यासमोर मांडली. आपण करीत असलेल्या आंदोलनास आम आदमी पक्षाच्यावतीने जाहीर पाठिंबा देत असून तुमचा प्रश्न मार्गी लागे पर्यंत तुमच्याबरोबर राहुल सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल असे आश्वासित केले. जर वेळीच शासनाकडून प्रश्न मार्गी लागला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यास आम आदमी पक्ष तुमच्याबरोबर असेल अशी ही आंदोलन करत्यांना त्यांनी सांगितले.

Releated Posts

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या धर्मशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन.

उपसंपादक- अक्षय थोरात  मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी उभारलेली ही सुसज्ज धर्मशाळा हजारो वारकऱ्यांसाठी हक्काचा निवारा ठरेल आणि…

ByBymnewsmarathi Jul 4, 2026