• Home
  • माझा जिल्हा
  • आम आदमी पक्षाच्या वतीने राजगुरुनगर ,खेड पंचायत समिती समोर सुरू असलेल्या सामाजिक कार्यकर्ते श्री.कुंडलिक कोहिनकर यांच्या बेमुदत मरण उपोषणाला दिला पाठिंबा!”
Image

आम आदमी पक्षाच्या वतीने राजगुरुनगर ,खेड पंचायत समिती समोर सुरू असलेल्या सामाजिक कार्यकर्ते श्री.कुंडलिक कोहिनकर यांच्या बेमुदत मरण उपोषणाला दिला पाठिंबा!”

राजगुरुनगर पंचायत समितीच्या समोर दिनांक 20 ऑगस्ट २०२४ पासून सामाजिक कार्यकर्ते श्री. कुंडलिक कोहिनकर यांनी भारत ब्रॉड बँड नेटवर्क लिमिटेड(बी. बी .एन. एल )कंपनीच्या ठेकेदारांचा घोटाळा/ भ्रष्टाचारासंदर्भात बेमुदत अमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे.
बी.बी.एन.एल. कंपनीने ग्रामपंचायतींना फायबर नेटवर्क इंटरनेट सुविधा देऊन डिजिटल बनविण्याचे योजनेमध्ये ३४हजार कोटीचा ठेकेदारांचा घोटाळा/भ्रष्टाचार/ काळाबाजार केलेला आहे. ही फसवणूक हा घोटाळा जनतेच्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी व या कंपनीवर ठोस कारवाई व्हावी. यासाठी श्री. कुंडलिक कोहिणकर व सहकारी बेमुदत आमरण उपोषणाला बसलेले आहेत.
या उपोषणाला राजगुरुनगर येथील पंचायत समिती समोर उपोषणस्थळी जाऊन आम आदमी पक्षाचे प्रदेश युवा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य श्री.मयुर दौंडकर व त्यांचे सहकारी यांनी पाठिंबा जाहीर केला. ज्या कारणासाठी उपोषण केले जात आहे तो प्रश्न समजून घेतला आणि उपोषणकर्त्यांना जनतेसाठी तुम्ही करीत असलेल्या कामाचे कौतुक करून तुमच्या बरोबर आम आदमी पक्ष सदैव राहील असे आश्वासनही दिले.

Releated Posts

सोमेश्वर विद्यालयात नवागतांचे स्वागत

मोरगाव – प्रतिनिधी सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयात पाचवीच्या वर्गात दाखल झालेल्या नवीन विद्यार्थ्यांचे…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ; जलसंधारण व शेती विकासाला नवी गती

सहसंपादक – अक्षय थोरात खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री…

ByBymnewsmarathi Jun 10, 2026

हरित भविष्यासाठी संत निरंकारी मिशनचे प्रेरणादायी पाऊल

प्रतिनिधी ‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्त खंडाळा, लोणावळासह देशभरातील १८ ठिकाणी वृक्षारोपण व स्वच्छता अभियान          …

ByBymnewsmarathi Jun 5, 2026